IND vs ENG: ना Sony LIV, ना JioHotstar! 'या' ठिकाणी पाहा 'फ्री'मध्ये वनडे सामना
Marathi July 14, 2026 06:25 PM

भारत विरुद्ध इंग्लंड IND VS ENG यांच्यातील तीन सामन्यांची वनडे ODI SERIES मालिका आज (14 जुलै) बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन येथे सुरू होत आहे. टी-20 मालिकेत 4-0 असा पराभव पत्करल्यानंतर, ODI CRICKET भारतीय संघ वनडे क्रिकेटमध्ये जोरदार पुनरागमन करण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. शुबमन गिलच्या SHUBMAN GILL नेतृत्वाखालील ही वनडे मालिका खेळली जाणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली व जसप्रीत बुमराह यांच्या पुनरागमनामुळे संघ अधिक मजबूत दिसत आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या वनडे सामन्याचे थेट प्रक्षेपण ‘सोनी स्पोर्ट्स नेटवर्क’वर उपलब्ध असेल. ज्या चाहत्यांना मोबाईल किंवा टॅब्लेटवर सामना पाहायचा आहे, त्यांच्यासाठी ‘सोनी लिव्ह’ Sony LIV आणि ‘जिओ हॉटस्टार’ JioHotstar ॲप्सवर थेट प्रक्षेपणाची सुविधा उपलब्ध असेल.

ज्यांना सामना मोफत पाहायचा आहे त्यांच्यासाठीही आनंदाची बातमी आहे. हा सामना ‘डीडी स्पोर्ट्स’ DD Sports चॅनेलवर विनामूल्य पाहता येईल. मात्र, यासाठी तुमच्या टीव्हीवर ‘डीडी फ्री डिश’ DD Free Dish कनेक्शन असणे आवश्यक आहे.

या मालिकेत गिल भारतीय संघाचे नेतृत्व करेल, तर रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा एकदा वनडे क्रिकेटमध्ये एकत्र खेळताना दिसतील. दुखापतीमुळे VIRAT KOHLI विराट अफगाणिस्तानविरुद्धची मागील वनडे मालिका खेळू शकला नव्हता. त्याच्या अनुपस्थितीत यशस्वी जैस्वालला संधी मिळाली होती.

दरम्यान, वेगवान गोलंदाज JASPRIT BUMRAH जसप्रीत बुमराहचेही वनडे संघात पुनरागमन झाले आहे. त्याच्या पुनरागमनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, कारण 2023 च्या वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर तो पहिल्यांदाच वनडे क्रिकेट खेळणार आहे.

वनडे मालिकेसाठी भारतीय संघ:

शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (यष्टिरक्षक), इशान किशन (यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, गुरनूर ब्रार आणि प्रिन्स यादव.

टी-20 मालिकेतील निराशा मागे सारून, भारतीय संघ वनडे मालिकेत विजयी सुरुवात करण्यासाठी सज्ज झाला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.