डी. के. वळसे पाटील
बारामती : संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, संतश्रेष्ठ सोपानकाका महाराज व संतश्रेष्ठ संतराज महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी बारामतीकरांनी जय्यत तयारी केलेली असून वारक-यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनानेही सर्वतोपरी तयारी केली आहे.
दरवर्षी बारामतीकर मोठया भक्तीभावाने पालखी सोहळ्याचे स्वागत करतात. प्रत्यक्ष पंढरपूरला जाता येत नसल्याने वारक-यांमध्येच विठ्ठलाला पाहून वारक-यांची मनोभावे सेवा केली जाते. बारामतीतील शारदा प्रांगणात बुधवारी (ता. 15)
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा व शुक्रवारी (ता. 17) सोपानकाका महाराजांच्या पालखीचा मुक्काम असेल. त्या साठी जर्मन हॅंगर उभारण्यात आला आहे. गुरुवारी (ता. 16) संतश्रेष्ठ संतराज महाराज पालखी सोहळा श्रावण गल्लीत विसावणार आहे.
Jejuri Accident Video : जेजुरीतील वारी अपघाताचा थरारक व्हिडिओ समोर; पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी चालकाबाबत दिली महत्त्वाची माहितीदरवर्षीच्या प्रथेनुसार यंदाही तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे देशमुख चौकात पालखी सोहळ्याचे स्वागत केले जाणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी औपचारिक स्वागत करणार आहेत.
बारामती शहरात विविध सेवाभावी संस्था व संघटनांच्या वतीने वारक-यांसाठी विविध विधायक उपक्रम राबविले जातात. यात अन्नदान, चहा व नाश्ता वाटप, वारक-यांना उपयोगी वस्तूंचे किट वाटप, फळेवाटप असे अनेक उपक्रम अनेक मंडळांच्या वतीने राबविले जाणार आहेत. त्याची जय्यत तयारी झाली आहे. रस्त्यांची डागडुजी, टँकर भरण्याची सोय, स्वच्छतागृहांसह वारक-यांच्या निवासाची सुविधा व इतरही मुलभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.
Monsoon Update : चार दिवस धो-धो कोसळून आता पाऊस कुठे गायब झाला? वाढत्या उन्हावर वैज्ञानिकांनी केला मोठा खुलासा वारक-यांच्या स्वागताला बारामतीकर उत्सुकसंतश्रेष्ठ तुकाराम महाराज, संतश्रेष्ठ सोपानकाका महाराज तसेच संतश्रेष्ठ संतराज महाराज पालखी सोहळ्यासाठी बारामतीकर उत्सुक असून वारक-यांना कोणतीही अडचण येऊ नये या साठी सर्वतोपरी तयारी केलेली आहे. भक्तीभावाने व उत्साहाने बारामतीकर या तिन्ही पालखी सोहळ्याचे स्वागत करणार आहेत. सचिन सातव, नगराध्यक्ष, बारामती नगरपरिषद, बारामती.