आयुष्यात ध्येय गाठायचे असतील तर, 'या' 4 सवयी आजच सोडा, तिसऱ्या सवयीवर ठेवा नियंत्रण
Tv9 Marathi July 14, 2026 07:45 PM

आजच्या काळात चांगलं आयुष्य स्वतःला जगायचं असेल आणि कुटुंबाला देखील चांगलं आयुष्य द्यायचं असेल तर, उच्च शिक्षण, चांगली नोकरी किंवा व्यवसाय असणं फार महत्त्वाचं असतं. पण आयुष्यात प्रगती करायची असेल, आपले ध्येय गाठायचे असतील तर, काही सवयी सोडल्याच पाहिजे असं खुद्द आचार्य चाणक्य सांगतात. चाणक्य सांगतात की, वाईट सवयी आपल्याला कधीच पुढे जाऊ देत नाहीत , त्या आपल्या प्रगतीत अडथळा आणतात. आचार्य चाणक्य यांनी म्हटलं आहे की, जे लोक आपल्या सवयींवर नियंत्रण ठेवायला शिकतात, तेच आयुष्यात पुढे जाऊ शकतात. त्यांच्या मते, प्रत्येकाने यापैकी काही सवयींवर नियंत्रण ठेवलं पाहिजे, ज्यामुळे आयुष्यात प्रगती साधण्यासाठी खूप मदत होईल. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या सवयी…

आपल्या रागावर नियंत्रण ठेवा : आचार्य चाणक्यांच्या मते, माणसाचा सर्वात मोठा शत्रू त्याचा राग आहे. जेव्हा आपल्याला राग येतो, तेव्हा रागाच्या भरात आपण अनेकदा चुकीचे निर्णय घेतो. यामुळे केवळ नातेसंबंधच बिघडत नाहीत, तर कामातही मोठा अडथळा निर्माण होतो. म्हणून, राग आल्यावर लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी काही काळ शांत राहा. यामुळे तुम्हाला भविष्यातील अनेक संकटे टाळण्यास तर मदत होईलच, शिवाय आयुष्यात पुढे जाण्यासही मदत होईल.

आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा : आचार्य चाणक्य म्हणतात की, बोलण्यापूर्वी आपण नेहमी काळजीपूर्वक विचार केला पाहिजे आणि नेहमी गोड शब्दांचा वापर केला पाहिजे. विचार न करता बोलण्याच्या सवयीमुळे केवळ चांगले संबंधच बिघडत नाहीत, तर आपल्या सर्व योजना इतरांना सांगून तुमच्या प्रगतीलाही अडथळा येतो. म्हणून आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा, नेहमी संयमाने बोला.

आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवा : आचार्य चाणक्यांच्या मते, जर आपण आपल्या मनावर आणि लोभावर नियंत्रण ठेवले नाही, मनावर नियंत्रणच नसेल तर आपण जीवनात कधीही आनंदी होऊ शकत नाही. म्हणून, आपल्याकडे जे आहे त्यात समाधानी राहा आणि आपले मन आपल्या ध्येयांवर केंद्रित करा. यामुळे तुमच्या जीवनात निश्चितपणे सकारात्मक बदल घडून येतील.

अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा : आचार्य चाणक्यांच्या मते, पैसा कमावणं जितकं महत्त्वाचे आहे, तितकंच त्याचा योग्यपणे वापर करणेही महत्त्वाचं आहे. जर तुम्ही पैसा उधळपट्टीने खर्च केलात, तर तुमच्या हातात काहीच पैसे शिल्लक राहणार नाहीत, ज्यामुळे श्रीमंत होण्याच्या तुमच्या स्वप्नातही अडथळा येईल. म्हणून कधीही उधळपट्टी करू नका.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही…)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.