अनेकांसोबत असं घडतं, व्यवसायामध्ये सर्व सुरळीत सुरू असतं. परंतु अचानक प्रगतीला ब्रेक लागतो. व्यवसाय पूर्वीप्रमाणे चालत नाही. प्रचंड कष्ट करून देखील तुम्हाला अपेक्षित यश मिळत नाही, तेव्हा तुम्ही विचार करता की असं नेमकं कशामुळे घडत असेल. त्यासाठी अनेक घटक कारणीभूत असतात. परंतु जेव्हा तुमच्या घरात किंवा दुकानात वास्तुदोष निर्माण होतो, तेव्हा देखील तुमच्यासोबत असं घडू शकतं, वास्तूदोष निर्माण होणं म्हणजे काय तर घरात कोणत्या न कोणत्या प्रकारे नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते, तेव्हा त्या घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते, आणि या गोष्टीचा तुमच्यावर तुमच्या व्यवसायावर नकारात्मक परिणाम होतो. अशा प्रकारच्या सर्व नकारात्मक ऊर्जेपासून तुमचं संरक्षण व्हावं यासाठी वास्तुशास्त्रामध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत. त्यातीलच काही उपायांबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत, चला तर मग पाहूयात वास्तुशास्त्रात काय सांगितलं आहे? त्याबद्दल.
तुरटीचा उपाय – जर अचानक तुमचा व्यवसाय ठप्प झाला असेल, तुम्ही कितीही कष्ट केले तरी तुम्हाला तुमच्या व्यवसायामधून अपेक्षित यश मिळत नसेल तर याचा अर्थ असाही होऊ शकतो की तुम्हाला कोणाची तरी नजर लागली आहे. त्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये तुरटीचा एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे, तुरटीचे काही खडे एका लाल कापडामध्ये बांधा आणि या कापडाची पोटली करून तुमच्या दुकानाच्या मुख्य दरवाजाच्या वर अडकून द्या, सर्व प्रकारची नकारात्म ऊर्जा दूर होऊन तुमचा व्यवसाय हा पूर्वीप्रमाणे पुन्हा सुरू होईल, असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे.
उतार – वास्तुशास्त्रानुसार तुमचं दुकान हे कधीही तीव्र उतारावर असू नये. तुम्ही जेव्हा तुमच्या व्यवसायासाठी एखाद्या दुकानाची निवड करतात तेव्हा ही गोष्टी आवश्य पहावी, दुकानासमोर अति तीव्र उतार असू नये, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
विजेचा खांबा – जेव्हा व्यवसायासाठी तुम्ही एखादं दुकानं भाड्याने घेतात, तेव्हा त्या दुकानाच्या मुख्य दरवाजासमोर कुठलाही अडथळा जसं की, विजेचा, खांबा, विहिरी किंवा शेवगा, चिंच किंवा एखादं काटेरी झाडं देखील असू नये, त्यामुळे तुमच्या व्यवसायला फटका बसू शकतो, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)