Alldigi Tech ने केली प्रत्येक शेअरवर 30 रुपये लाभांशाची घोषणा, रेकाॅर्ड तारीखही जाहीर
ET Marathi July 26, 2026 11:45 AM
मुंबई : टेक आणि डिजिटल क्षेत्रातील दिग्गज कंपनी ऑलडिजी टेक लिमिटेडने आपल्या गुंतवणूकदारांना १२ व्यांदा लाभांश देणार आहे. कंपनीने जूनमध्ये संपलेल्या २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. यावेळी भागधारकांना प्रति शेअर ३००% लाभांशाची घोषणा करण्यात आली. कंपनीने म्हटले की, संचालक मंडळाने २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी १० रुपये दर्शनी मूल्याच्या प्रत्येक शेअरवर ३० रुपयांचा जाहीर केला आहे.

लाभांश रेकॉर्ड तारीख
ऑलडिजी टेक लिमिटेडने जाहीर केलेल्या लाभांशासाठी भागधारकांची पात्रता निश्चित करण्यासाठी ३१ जुलै २०२६ ही रेकॉर्ड तारीख निश्चित करण्यात आली आहे. ज्या गुंतवणूकदारांची नावे या तारखेपर्यंत कंपनीच्या भागधारक नोंदणी किंवा डिपॉझिटरी रेकॉर्डमध्ये नोंदणीकृत असतील ते हा अंतरिम लाभांश मिळण्यास पात्र असतील.

लाभांश पेमेंट तारीख
कंपनीने लाभांश देण्याची तारीख देखील जाहीर केली आहे. रेकॉर्ड तारखेला नोंदणीकृत असलेल्या भागधारकांच्या बँक खात्यांमध्ये लाभांशाची रक्कम २० ऑगस्ट २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी जमा केली जाईल. कंपनीचा८२१ रुपयांवर आहे.

तिमाही निकाल
ऑलडिजी टेकने आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीत एकत्रित महसूल १५०.३ कोटी रुपये मिळवला आहे. हा आकडा मागील वर्षीच्या याच तिमाहीतील १४३.९ कोटींच्या तुलनेत वार्षिक ४.४% वाढ दर्शवतो. कंपनीचा नफा मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीतील १४.९ कोटींवरून वार्षिक २१.७ टक्क्यांनी वाढून १८.१ कोटींवर पोहोचला आहे. EBITDA मागील वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील ३६.६ कोटींच्या तुलनेत वार्षिक १३.१% च्या मजबूत वाढीसह ४१.४ कोटींवर पोहोचला. EBITDA मार्जिन वार्षिक २१० बेसिस पॉइंट्सने वाढून Q1 FY26 मधील २५.४ टक्क्यांवरून २७.५ टक्क्यांवर पोहोचला आहे.
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.