दररोज ४० विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, शिक्षण व्यवस्थेचे अपयश असल्याचे तज्ज्ञांचे मत; धक्कादायक आकडेवारी समोर
esakal July 26, 2026 12:45 PM

मुंबई : 'नीट' पेपरफुटीविरोधात तरुण न्यायासाठी रस्त्यावर उत्तरले असतानाच दुसरीकडे स्पर्धा, अपेक्षांचे ओझे, मानसिक तणाव आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींच्या कचाट्यात अडकलेले हजारो विद्यार्थी टोकाचे पाऊल उचलत आहेत.

एका सरकारी अहवालानुसार देशात दररोज सरासरी ४० विद्यार्थी आयुष्य संपवत असल्याचे विदारक चित्र आहे. पेपरफुटीनंतर रद्द झालेल्या परीक्षेमुळे अनेक विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्या शिक्षण व्यवस्थेपुढे उभ्या ठाकलेल्या गंभीर संकटाची घंटा असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. 'नीट' पेपरफुटी आंदोलनामुळे परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Mumbai News: Gen-Z चं मोठं यश, मुंबईत मोर्चा होणारच; ठाकरे बंधूंनी दिली मोठी माहिती

विद्यार्थी आत्महत्यांचे मूळ केवळ पेपरफुटीत नाही. प्रवेश परीक्षांतील जीवघेणी स्पर्धा, गुणांवर उभारलेली यशाची व्याख्या, पालकांच्या वाढत्या अपेक्षा, कोचिंग संस्कृती, करिअरची अनिश्चितता, बेरोजगारीची भीती आणि मानसिक आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष यांचा एकत्रित परिणाम विद्यार्थ्यांवर होत आहे. पेपरफुटीसारख्या घटना या तणावात आणखी भर घालतात, असे शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

विद्यार्थी आत्महत्यांवरसमुपदेश हाच उपाय आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालये आणि स्पर्धा परीक्षा केंद्रांत सक्षम समुपदेशन व्यवस्था उभारणे, मानसिक आरोग्याला शिक्षणाइतकेच महत्त्व देणे आणि विद्यार्थ्यांत सातत्याने संवाद वाढविणे अत्यावश्यक असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांनी मत व्यक्त केले. शिक्षणासाठीचे स्थलांतर, स्पर्धा परीक्षांचे वाढते दडपण आणि शहरी जीवनशैलीचा मानसिक परिणाम यांचा सखोल अभ्यास करण्याची गरजही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

'एनसीआरबी'च्या 'अॅक्सिडेंटल डेथ्स अँड सुसाईड्स इन इंडिया'च्या अहवालानुसार २०२४मध्ये देशात १४ हजार ४८८ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. २०२३ च्या तुलनेत ही ४.३ टक्के वाढ आहे. याच कालावधीत देशातील एकूण आत्महत्यांत किंचित घट झाली असताना विद्यार्थी आत्महत्या वाढल्या आहेत. देशातील एक लाख ७० हजार ७४६ आत्महत्यापैकी ८.५ टक्के आत्महत्या विद्यार्थ्यांच्या आहेत.

Karj Mafi: लाखो शेतकऱ्यांना मोठा धक्का! कर्जमाफी योजनेत थेट अपात्र; सरकारच्या तिजोरीतील पाच हजार कोटींची बचत महाराष्ट्रात मोठी संख्या

२०२४ मध्ये महाराष्ट्रात १,९०९ विद्यार्थी आत्महत्या नोंदल्या गेल्या. देशातील सर्व राज्यांत हा सर्वाधिक आकडा असून, एकूण विद्यार्थी आत्महत्यांपैकी १३.२ टक्के महाराष्ट्रात झाल्या आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेश (१०.९ टक्के), मध्य प्रदेश (१० टक्के) आणि तमिळनाडू (८.९ टक्के) यांचा क्रमांक लागतो.

दहावीचे सर्वाधिक बळी : एनसीआरबीच्या

आकडेवारीनुसार, आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण २५.६ टक्के इतके सर्वाधिक आहे. त्यानंतर बारावीपर्यंतचे १८.३ टक्के आणि आठवीपर्यंतचे १७.७ टक्के विद्यार्थी आहेत. २०२४मध्ये आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ७,६६१ पुरुष, तर ६,८१९ महिला होत्या.

सर्वाधिक विद्यार्थी

आत्महत्या (२०२४)

  • महाराष्ट्र - १९०९ - १३.२%

  • उत्तर प्रदेश - १,५८५ - १०.९%

  • मध्य प्रदेश - १,४४७ - १०.०%

  • तमिळनाडू - १,२८७ - ८.९%

Kalu Waterfall drowning : माळशेज घाटातील काळू धबधब्यावर दुर्दैवी घटना; नदीच्या प्रवाहात बुडून दोन तरुणांचा मृत्यू विद्यार्थी आत्महत्या (स्रोत : एनसीआरबी)
  • २०२१ - १३,०८९

  • २०२२ - १३,०४४

  • २०२३ - १३,८९२

  • २०२४ - १४,४८८

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.