Shri Vitthal Nirmal Dindi Puraskar 2026: कौंडण्यपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा; 'श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार'मध्ये प्रथम, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव
esakal July 26, 2026 01:45 PM

तिवसा: देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आयोजित ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार-२०२६’मध्ये श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संस्थानने प्रथम क्रमांक पटकावत मानाचा बहुमान मिळविला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संस्थानला एक लाख रुपयांचा धनादेश व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. शतकानुशतके अखंड सुरू असलेल्या पायी वारीच्या परंपरेला स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, सामाजिक जनजागृती आणि समाजप्रबोधनाची जोड देणाऱ्या दिंड्यांचा या पुरस्काराद्वारे गौरव करण्यात आला.

Nagpur News: संघ मुख्यालयबाबत आक्षेपार्ह पोस्ट; युजरविरोधात कोतवाली ठाण्यात गुन्हा दाखल

यंदाच्या स्पर्धेत श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संस्थानने प्रथम क्रमांक मिळविला. त्यांना एक लाख रुपयांचा धनादेश व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव तथा पालखी सोहळा प्रमुख सदानंद साधू व दिंडी चालक पंकज महाराज महल्ले उपस्थित होते.

द्वितीय क्रमांक जालना येथील वारकरी धर्मसंकीर्तन सेवा प्रतिष्ठान यांना मिळाला. त्यांना ७५ हजार रुपयांचा धनादेश व सन्मानचिन्ह देण्यात आले. तर तृतीय क्रमांक आळंदीच्या श्री गोऱ्हेकर संस्था यांनी पटकावला. त्यांना ५० हजार रुपयांचा धनादेश व सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले.

Instagram Protest: ‘इन्स्टाग्राम’ ठरले प्रभावी माध्यम; CJI सूर्यकांत यांचं विधान ते प्रधानांचा राजीनामा व्हाया ‘जंतरमंतर’

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा, समाजप्रबोधनातील दिंड्यांचे योगदान आणि ‘स्वच्छ, निर्मल वारी’च्या संकल्पनेचे कौतुक केले. वारकरी परंपरेतून समाजाला सकारात्मक दिशा देणाऱ्या अशा उपक्रमांना राज्य शासनाकडून भविष्यातही प्रोत्साहन दिले जाईल, असे त्यांनी सांगितले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.