ठाकरे बंधूंच्या संयुक्त तिरंगा विजय जल्लोषसाठी ठाण्यातून ठाकरे गटाचे शिवसैनिक आणि मनसैनिक मुंबईकडे रेल्वे ने ठाणे स्थानक येथून रवाना... केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामा दिल्यानंतर...आज मुंबईत 'ठाकरे बंधूं'ची संयुक्त तिरंगा विजय जल्लोष पाहायला मिळणार.... दिल्लीतील जंतर-मंतरवर नीट पेपर फुटी वर विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या लाठीमार आणि केंद्र सरकारच्या विरोधात 'ठाकरे बंधूं'ची तोफ धडाडणार...
Sindhudurg : बाबा धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दीनिसर्गाच्या कुशीत असलेल्या बाबा धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी सिंधुदुर्गातील सर्वात उंच असणारा आंबोली जवळील कुंभवडेचा बाबा धबधबा सध्या ओसंडून वाहत आहे. सह्याद्रीच्या कुशीतून फेसाळत कोसळणाऱ्या या धबधब्यावर पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. आज रविवार असल्यामुळे सांगली,कोल्हापूर, बेळगाव, गोवा तसेच सिंधुदुर्गातील पर्यटकांनी बाबा धबधब्यावर गर्दी केली आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगात एक प्रशस्त गुहा आणि या गुहेच्या वरून साधारण २०० ते २५० फूट उंचीवरुन कोसळणारा हा धबधबा पर्यटकांचे मोठे आकर्षण आहे.
Mumbai News : ठाकरे बंधूंचा आज मुंबईत तिरंगा विजयी जल्लोषठाकरे बंधूंचा आज मुंबईत महामोर्चा होणार आहे. दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलनाला पाठिंब्यासाठी सुरुवातीला मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर तिरंगा विजयी जल्लोष मोर्चाचं आंदोलन करण्यात येत आहे. राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेतेही यात सहभागी होण्याची शक्यता आहे.
Akola News शिंदेंच्या नेत्याच्या अपघाती मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखावर घातपाताचा आरोपअकोल्यातील शिवसेना शिंदे गटाचे अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मोहसीन शेख यांचा मृत्यू अपघाती नसून हत्या असल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय. पक्षाचेच माजी जिल्हाप्रमुख मंगेश काळे यांच्यावर केलेल्या आरोपाने खळबळ उडाली आहे. २२ जुलैला संध्याकाळी मोहसीन यांच्या दुचाकीला मागून चारचाकी वाहनाने धडक झाल्यानं मृत्यू झाला होता.
Kolhapur News अंबाबाई मंदिरातील गणेशाचे आसन पूजनश्री महालक्ष्मी भक्त मंडळातर्फे अंबाबाई मंदिरातील खजिन्यावरील गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणपतीचा गणेश उत्सव साजरा केला जातो. यंदाचे १३६ वे वर्ष असून, आषाढी एकादशीनिमित्त पाट (गणपती आसन) पूजनाने केली जाते. हे आसन पूजन चातुर्मास्यारंभाच्या सुरुवातीस आणि सर्वसाधारण गणेश उत्सवाआधी ५१ दिवस आसन कुंभाराकडे सोपविण्याची प्रथा श्री महालक्ष्मी भक्त मंडळाने सुरू ठेवली आहे.
Bihar News नीट पेपरफुटी विरोधात आंदोलनाला बिहारमध्ये हिंसक वळण‘नीट पेपरफुटी’ आणि आंदोलक विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईच्या निषेधार्थ पुकारलेल्या ‘बिहार बंद’ला शनिवारी हिंसक वळण लागले. डाव्या विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांत निदर्शने केली असून, अनेक ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये चकमक झाली.