Latest Marathi News Update : शिंदेंच्या नेत्याचा अपघाती मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखावर घातपाताचा आरोप
esakal July 26, 2026 12:45 PM
Mumbai News : ठाकरे बंधूंचा आज मुंबईत तिरंगा विजयी जल्लोष

ठाकरे बंधूंचा आज मुंबईत महामोर्चा होणार आहे. दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलनाला पाठिंब्यासाठी सुरुवातीला मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर तिरंगा विजयी जल्लोष मोर्चाचं आंदोलन करण्यात येत आहे. राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेतेही यात सहभागी होण्याची शक्यता आहे.

Akola News शिंदेंच्या नेत्याच्या अपघाती मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखावर घातपाताचा आरोप

अकोल्यातील शिवसेना शिंदे गटाचे अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मोहसीन शेख यांचा मृत्यू अपघाती नसून हत्या असल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय. पक्षाचेच माजी जिल्हाप्रमुख मंगेश काळे यांच्यावर केलेल्या आरोपाने खळबळ उडाली आहे. २२ जुलैला संध्याकाळी मोहसीन यांच्या दुचाकीला मागून चारचाकी वाहनाने धडक झाल्यानं मृत्यू झाला होता.

Kolhapur News अंबाबाई मंदिरातील गणेशाचे आसन पूजन

श्री महालक्ष्मी भक्त मंडळातर्फे अंबाबाई मंदिरातील खजिन्यावरील गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणपतीचा गणेश उत्सव साजरा केला जातो. यंदाचे १३६ वे वर्ष असून, आषाढी एकादशीनिमित्त पाट (गणपती आसन) पूजनाने केली जाते. हे आसन पूजन चातुर्मास्यारंभाच्या सुरुवातीस आणि सर्वसाधारण गणेश उत्सवाआधी ५१ दिवस आसन कुंभाराकडे सोपविण्याची प्रथा श्री महालक्ष्मी भक्त मंडळाने सुरू ठेवली आहे.

Bihar News नीट पेपरफुटी विरोधात आंदोलनाला बिहारमध्ये हिंसक वळण

‘नीट पेपरफुटी’ आणि आंदोलक विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईच्या निषेधार्थ पुकारलेल्या ‘बिहार बंद’ला शनिवारी हिंसक वळण लागले. डाव्या विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांत निदर्शने केली असून, अनेक ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये चकमक झाली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.