South Actress Post on CJP Protest: नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी राजीनामा दिल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीसह (CJP Protest) देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. अनेक सेलिब्रेटी, विद्यार्थी सोशल मीडियावर या संदर्भात पोस्ट करत आहेत. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा विद्यार्थ्यांसाठी मोठा विजय मानला जातोय.राजकीय वर्तुळासह मनोरंजन सृष्टीतील कलाकारही कॉकरोच जनता पार्टीसह सोनम वांगचुक, अभिजीत दिपके, आंदोलन, विद्यार्थ्यांच्या यशावर पोस्ट करताना दिसतायत. दरम्यान, एका साउथ अभिनेत्रीच्या कमेंटने सध्या लक्ष वेधलं आहे. आई म्हणून आमच्या मुलांनी अभिजीत दिपके, सौरव दाससारखं व्हावं असं वाटत असल्याचं म्हणत एक पोस्ट केलीय. या पोस्टची सध्या चर्चा रंगलीय.
साउथ अभिनेत्री ज्योतीकाने सोशल मीडियावर पोस्ट करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागल्याचं म्हणत विद्यार्थ्यांच्या दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा दिलाय. ती म्हणाली," धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. विद्यार्थ्यांसाठी आणि या देशाच्या भविष्यासाठी मी भूमिका घेत आहे.भारतीय लोकशाही आणि शिक्षण व्यवस्था सुधारण्याच्या या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे.सोनम वांगचुक यांना सलाम. एक आई म्हणून माझ्या मुलांना अभिजीत दिपके आणि सौरव दास यांच्यासारखं मला बनवायला आवडेल. जेन झी मला तुमचा अभिमान वाटतो.तुम्ही हे सिद्ध करून दाखवले की आपण एकत्र भारत आहोत. आम्हाला निर्भीड बनवल्याबद्दल धन्यवाद.' अशी पोस्ट या अभिनेत्रीने केली आहे.
View this post on Instagram
दिल्लीच्या जंतर मंतर येथे सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला.शनिवारी सोशल मीडियावर एक पत्र शेअर करत त्यांनी आपल्या राजीनामाची घोषणा केली.हा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला असून आता भाजपचे नेते प्रल्हाद जोशी हे हंगामी शिक्षण मंत्री म्हणून काम पाहणार आहेत.