नीट पेपरफुटी प्रकरणी कारवाई करावी आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या या मागणीसाठी दिल्लीत जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनाला य़श मिळालं. सीजेपीचा संस्थापक अभिजीत दीपके यानं देशातील महत्त्वाच्या शहरात आंदोलन केल्यानंतर जंतर मंतरवर आंदोलन सुरू केलं होतं. या आंदोलनात नंतर सोनम वांगचुक हे सहभागी झाले आणि त्यांनी तब्बल २६ दिवस उपोषण केलं. राजीनाम्याच्या मागणीवर सर्वजण शेवटपर्यंत ठाम राहिले आणि अखेर धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. यामुळे देशभरात विद्यार्थी, पालकांसह आंदोलनाला पाठिंबा दिलेल्यांकडून जल्लोष साजरा केला जात आहे. Why Did Shirsat Meet Abhijeet Deepake Parents
सीजेपी संस्थापक अभिजीत दीपके हा महाराष्ट्रातल्या छत्रपती संभाजीनगरचा असून त्याच्या मूळ गावीही गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर जल्लोष साजरा केला. दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी अभिजीत दीपकेच्या निवासस्थानी जाऊन आई वडिलांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
अर्थमंत्री रुपयावर बोलेनात, राजनाथ देशाऐवजी धर्मेंद्रच्या संरक्षणाला, तर खड्डामंत्री...; ठाकरेंचा मोदींच्या मंत्र्यांना टोमणासंजय शिरसाट यांनी दीपकेच्या आई वडिलांची भेट घेतल्यानंतर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, दीपके कुटुंबियांशी आमचे नातेसंबंध आहेत. आंदोलन सुरू असताना राजकीय वळण लागू नये म्हणून मी भेटायला आलो नाही. आता अभिजीतच्या प्रकृतीची चौकशी करायला आलो आहे. सरकार त्याची योग्य ती काळजी घेईल.
शिरसाट यांच्या भेटीवर अभिजीतचे वडील भगवान दीपके यांनी म्हटलं की, मंत्री संजय शिरसाट यांनी दिलेल्या स्पष्टीकरणामुळे मनातले अनेक प्रश्न आणि शंका दूर झाल्या. आंदोलनावेळी राजकारण होऊ नये यासाठी ते आले नव्हते. आता आंदोलनाला यश मिळाल्याचं आनंद आहे.
अभिजीतच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अभिजीत दीपकेच्या आई अनिता यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, या आंदोलनाला देशासह महाराष्ट्राची ताकद मिळाली आमि त्यामुळेच केंद्र सरकारला झुकावं लागलं. अभिजीतच्या वडिलांनी म्हटलं की, अभिजीतच्या पाठिशी महाराष्ट्रासह देशातील तरुणाई आणि पालक ठामपणे उभा राहिल्याने विद्यार्थ्यांचा आवाज त्याला सरकारपर्यंत पोहोचवता आला. आज मुलाचा अभिमान वाटतो अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.