-प्रशांत घाडगे
सातारा : एका हातात वैद्यकीय शिक्षणाची पुस्तके, तर दुसऱ्या हातात परंपरेचे रंग... अशा आधुनिक शिक्षणाची वाट चोखाळताना कौटुंबिक वारशाची नाळ जपणारी साताऱ्यातील वैष्णवी पोपट कुंभार अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. नीट परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवून पुण्यात एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत असतानाही चौथ्या पिढीच्या पारंपरिक व्यवसायाशी तिचे नाते तुटलेले नाही. बेंदूर सणानिमित्त बैल रंगविण्याच्या कामात ती उत्साहाने सहभागी होत कुटुंबाला हातभार लावत आहे.
Raigad Wildlife: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! अंबा नदीत आढळला परदेशी व दुर्मिळ 'अल्बिनो एलीगेटर गार' मासा; रायगडमध्ये दुर्मिळ परदेशी माशाचा शोधवैष्णवीने पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण साताऱ्यातील अनंत इंग्लिश स्कूलमध्ये घेतले. लहानपणापासून डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तिने अकरावी-बारावीचे शिक्षण औंध येथे पूर्ण केले, तर नीट परीक्षेच्या तयारीसाठी लातूर येथे क्लास लावला होता. मेहनतीच्या जोरावर तिला पुण्यातील काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसला प्रवेश मिळाला. मात्र, शिक्षणाच्या धावपळीतही तिने कुटुंबाचा वारसा विसरलेला नाही.
साताऱ्यातील शुक्रवार पेठेतील बदामी विहिरीजवळील त्यांच्या घरी अनेक पिढ्या मूर्तिकला आणि सणानिमित्त बैल रंगविण्याचा पारंपरिक व्यवसाय सुरू आहे. या व्यवसायात वैष्णवी आवर्जून सहभागी होत कुटुंबाला मदत करत आहे. आधुनिक शिक्षण आणि पारंपरिक संस्कृती यांचा सुंदर संगम साधत चौथी पिढीही हा वारसा जपण्याचा निर्धार करत असल्याचे तिच्या कृतीतून दिसून येते.
डॉक्टर होण्याचे माझे स्वप्न पूर्ण होत असले, तरी माझ्या कुटुंबाचा पारंपरिक व्यवसाय ही माझी ओळख आहे. आधुनिक शिक्षण घेत असतानाही आपल्या संस्कृतीशी नाळ जोडलेली राहावी, असे मला वाटते. बेंदूर सणात बैल रंगविण्याच्या कामात सहभागी होताना वेगळाच आनंद मिळतो. आपल्या मागील पिढीचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे हीदेखील आपली जबाबदारी आहे.
- वैष्णवी कुंभार, एमबीबीएस प्रथम वर्षातील विद्यार्थिनी
Monsoon forecast: ‘एल निनो’ नोव्हेंबरमध्ये सर्वोच्च पातळीवर पोहोचणार: ‘सीपीसी’चा अंदाज; मार्चमध्ये तीव्रता कमी होण्याची शक्यता गणपती, बेंदराला साताऱ्यातएमबीबीएसचे शिक्षण सुरू असल्याने वैष्णवी सध्या पुण्यात असते. मात्र, बेंदूर, गणेशोत्सव, नवरात्र अशा प्रत्येक सणासाठी ती आवर्जून काही दिवस तरी साताऱ्यात येते. मातीच्या मूर्ती घडविण्यापासून रंगकामापर्यंत प्रत्येक टप्प्यात कुटुंबाला हातभार लावते. या कामातून केवळ परंपरा जपली जात नाही, तर तिला मानसिक समाधान आणि नव्या उमेदीची ऊर्जा मिळते.