Jana Nayagan BO Collection: 'जन नायकन'ला (Jana Nayagan) बॉक्स ऑफिसवर (Jana Nayagan Box Office Collection) प्रचंड प्रतिसाद मिळतोय. पडद्यावर थलपती विजय यांना पाहण्यासाठी प्रेक्षकांची अक्षरशः झुंबड उडाली आहे. 23 जुलै रोजी प्रदर्शित झालेला हा सिनेमा आता 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झालाय. फक्त चारच दिवसांत सिनेमानं सर्व दिग्गजांच्या सिनेमांना लोळवलंय. सिनेमानं रिलीजच्या चौथ्या दिवशी किती कोटींचा गल्ला जमवला? सविस्तर पाहूयात...
'जन नायकन'ची चौथ्या दिवसाची कमाई (Jan Nayakan Fourth Day Earning)
'सॅकनिल्क'च्या (Sacnilk) माहितीनुसार, 'जन नायकन' सिनेमानं रविवारी 32 कोटी रुपयांची कमाई केलीय. या सिनेमाचे आतापर्यंत 12,080 शोज झालेत आणि प्रेक्षकांची उपस्थिती (ऑक्युपन्सी रेट) 43.7 टक्के इतकी नोंदवली गेली आहे.
| दिवस | बॉक्स ऑफिस | ऑक्यूपेन्सी |
| चौथा दिवस | 32 (10.30 वाजेपर्यंत) | 43.7 टक्के |
| एकूण | 124.75 कोटी |
View this profile on Instagram
'जन नायकन'चं डे वाइज कलेक्शन (Jan Nayakan Day Wise Collection)
'जन नायकन' सिनेमानं पहिल्या दिवशी 42.70 कोटी रुपयांची कमाई केलीय. रिलीजच्या दिवशी सिनेमाला 13,000 शोज मिळाले आणि 41.6 टक्के ऑक्युपन्सी रेट नोंदवला गेला. दुसऱ्या दिवशी, सिनेमानं बॉक्स ऑफिसवर 21.15 कोटी रुपयांची कमाई केलीय. तिसऱ्या दिवशी, सिनेमानं 28.50 कोटी रुपये कमावलेत. विशेष म्हणजे, सिनेमानं भारतात 119.02 कोटी रुपये आणि परदेशातील बाजारपेठांमध्ये 63.50 कोटी रुपयांची कमाई केली. सिनेमाची एकूण जागतिक कमाई 171.84 कोटी रुपये इतकी झाली.
सिनेमाचं दिग्दर्शन एच. विनोद यांनी केलंय. थलपथी विजय यांच्याव्यतिरिक्त पूजा हेगडे देखील या सिनेमात आहे. थलपथी विजय यांच्या ॲक्शन सीन्सनी चाहत्यांना भूरळ घातलीय. उल्लेखनीय बाब म्हणजे, थलपथी विजय यांनी आता अभिनयातून निवृत्ती घेतली आहे, हा त्यांचा अखेरचा सिनेमा ठरलाय. हा सिनेमा मूळतः जानेवारीत प्रदर्शित होणार होता, पण सेन्सर बोर्डाकडून सर्टिफिकेट न मिळाल्यामुळे तो पुढे ढकलण्यात आलेला. आता तो जुलैमध्ये रिलीज करण्यात आला आहे.
Jana Nayagan Movie Review: तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय आणि भारताची लोकशाही साजरी करणारी फिल्म