कोल्हापूर : जिल्ह्यात २४ तासांत १४.२४ मिमी. पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात झाला (Gaganbawda highest rainfall update) असून, तेथे ५३.८ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. राधानगरी धरण ९० टक्के भरले असून, विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील १७ बंधारे पाण्याखाली आहेत. दरम्यान, चांदोली येथील वारणा धरणाचे चारही वक्राकार दरवाजे उघडण्यात आले आहेत.
हातकणंगले तालुक्यात ३.९ मिमी. पावसाची नोंद झाली. शिरोळमध्ये १.३, पन्हाळ्यात १३.१ शाहूवाडीत ११.६, राधानगरीत २१.८ मिमी. पाऊस पडला. करवीर तालुक्यात ७.३ मिमी., कागल तालुक्यात ७.१ मिमी. आणि गडहिंग्लज तालुक्यात १२.१ मिमी. पावसाची नोंद झाली. भुदरगडमध्ये १४.३ मिमी., आजऱ्यात १५.७ मिमी., चंदगडमध्ये ८.९ मिमी. पाऊस पडला.
वारणा नदी पात्रात ३४०० क्युसेक विसर्ग सुरूतुरुकवाडी : वारणा धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार असून, आवक पाण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काल ४.३० वाजता धरणाचे चारही वक्राकार दरवाजे उघडण्यात आले. धरणाच्या दरवाजातून २०००, तर वीजनिर्मिती केंद्रातून १४०० असा एकूण ३४०० क्युसेक इतका विसर्ग वारणा नदी पात्रात सुरू आहे. त्यामुळे वारणानदी काठावरील जनतेने सतर्क राहण्याचे आवाहन शाखा उपअभियंता सुदाम कुंभार यांनी केले. धरण ८३ टक्के भरले आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग वाढविण्यात येणार, असे सांगण्यात आले.
Kelghar Ghat Landslide : चालक अजरुद्दीनच्या प्रसंगावधानामुळे वाचला जीव! केळघर घाटात जेसीबीवरच मोठी दरड कोसळली; महाबळेश्वर-सातारा मार्ग पूर्णपणे ठप्प नागणवाडी मध्यम प्रकल्प भरलापिंपळगाव : भुदरगड तालुक्यातील बारवे-दिंडेवाडी (नागणवाडी) येथील मध्यम प्रकल्प काल सकाळी पूर्ण क्षमतेने भरला. प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. या प्रकल्पाची संचय पातळी १२४.५० मीटरपर्यंत पोहोचली असून, एकूण पाणीसाठा तब्बल ८.४४ दशलक्ष घनमीटर झाला आहे. प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याची अधिकृत माहिती अभियंता एम. के. चव्हाण यांनी दिली.
धरणातील पाणीसाठा (कंसात टक्केवारी)राधानगरी ७.४९ टीएमसी (९०)
तुळशी २.५७ टीएमसी (७४)
वारणा २८.४२ टीएमसी (८३)
दूधगंगा १३.६६ टीएमसी (५४)
कासारी २.१३ टीएमसी (७७)
कडवी २.१३ टीएमसी (८५)
कुंभी १.९३ टीएमसी (७१)
पाटगाव २.३४ टीएमसी (६३)
चिकोत्रा ०.७४ टीएमसी (१००)
आंबेओहळ १.०५ टीएमसी (१००)
सर्फनाला ०.६७ टीएमसी (१००)
धामणी १.२९ टीएमसी (३४)
कोदे ०.२१ टीएमसी (१००)
Warana Dam Water Release VIDEO : सांगलीकरांनो सावधान! वारणा धरणाचे 4 दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा; 3,400 क्युसेकने विसर्ग सुरू चांदोली धरणाचे दरवाजे उघडलेवारणावती : वारणा (चांदोली) धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणातील साठ्यात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे परिचलन सूचीनुसार धरणातील पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी सोमवारी (ता. २७) दुपारी ४.३० वाजता धरणाचे चारही वक्राकार दरवाजे उघडून वारणा नदीपात्रात २००० व जलविद्युत प्रकल्पातून १४०० असा एकूण ३,४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास अथवा धरणातील आवक वाढल्यास परिस्थितीनुसार विसर्गात वाढ करण्यात येईल, असे धरण प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सोमवारी दुपारी चारपर्यंत धरणाची पातळी ६२०.९५ मीटर इतकी नोंदविली. धरणातील एकूण साठा २८.६६ टीएमसी (८३.३० टक्के) असून, उपयुक्त जलसाठा २१.७८ टीएमसी झाला आहे. गतवर्षी याच दिवशी धरणातील उपयुक्त जलसाठा २२.३३ टीएमसी (८१.१३ टक्के) होता.
धरण परिसरात गेल्या २४ तासांत ४८ मिमी पावसाची नोंद झाली असून, हंगामातील एकूण पर्जन्यमान १,३७२ मिमीवर पोहोचले आहे. सध्या धरणात ८,१२६ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने वारणा नदीकाठच्या गावांतील नागरिक, शेतकरी आणि ग्रामस्थांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. पात्रात उतरणे, पोहणे, कपडे किंवा जनावरे धुणे टाळावे. तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन धरण व्यवस्थापनाने केले आहे.