श्रीरामपूर : ‘दृश्यम’ चित्रपटातील सस्पेन्स आणि ‘पुष्पा’ किंवा ‘सिंघम’सारख्या साऊथ ॲक्शनपटातील क्लायमॅक्सलाही मागे टाकेल, असा थरारक ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ श्रीरामपूर शहरात घडला. कौटुंबिक वादाच्या ठिणगीतून जावयाने बोनेटवर बसलेल्या सासूसह रस्त्यावरून सुसाट मोटार पळवली. या थराराचा अखेर सय्यदबाबा चौकात नागरिकांनी प्रसंगावधान राखून वाहने आडवी लावल्याने आणि मेहुण्याने कारच्या काचेवर दगडफेक केल्याने ‘दी एन्ड’ झाला.
NEET Success Story: जिद्दीला यशाची साथ! साताऱ्यातील अथर्व बागलची ‘नीट’मध्ये ६३१ गुणांची दमदार कामगिरी; डॉक्टर होण्याच्या स्वप्नाला नवी झेपराहुरी तालुक्यातील प्रवरा काठावरील एका गावातील तरुणाने श्रीरामपुरातील तरुणीशी तीन महिन्यांपूर्वी आळंदी येथे आंतरजातीय विवाह केला होता. या प्रकरणातील कायदेशीर प्रक्रियेच्या अनुषंगाने हे नवदाम्पत्य श्रीरामपूर न्यायालयात आले होते. न्यायालयीन कामकाज आटोपून दोघेही परतण्याच्या तयारीत असतानाच, प्रवेशद्वारावर मुलीचे नातेवाईक, आई आणि भाऊ दाखल झाले. त्यांनी तेथे गोंधळ घातला.
नातेवाईकांचा आक्रमक पवित्रा पाहून तरुणाने कार सुसाट पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त झालेल्या मुलीच्या आईने जिवाची पर्वा न करता थेट चालू कारच्या बोनेटवर उडी घेतली. सासू बोनेटवर लटकलेली असतानाही तरुणाने ब्रेक न लावता कार सय्यदबाबा चौकाच्या दिशेने सुसाट दामटली. ‘माझ्या मुलीला वाचवा,’ असा टाहो फोडत ती महिला कसाबसा जीव सांभाळत होती.
दुचाकीवरून पाठलाग करणाऱ्या मुलीच्या भावाने सय्यदबाबा चौकात कार गाठून थेट समोरील काचेवर मोठा दगड मारला. त्यामुळे काच चक्काचूर झाली. त्याचवेळी महिलेचा आक्रोश आणि मुलीचे अपहरण होत असल्याच्या संशयावरून चौकातील स्थानिक नागरिक व तरुणांनी तातडीने स्वतःची वाहने कारसमोर आडवी लावली. चारही बाजूंनी रस्ता रोखल्याने अखेर कार थांबली आणि काही किलोमीटर चाललेले हे थरार नाट्य संपुष्टात आले.
Jayakwadi Dam: जायकवाडी धरणासाठी आनंदाची बातमी! अवघ्या १२ तासांत जलसाठ्यात २ टक्क्यांची वाढ पोलिस ठाण्यात वादावर पडदाया नाट्यमय घडामोडींनंतर हे प्रकरण थेट श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात पोहोचले. तेथे तरुणाने ‘आपली सासूविरोधात कोणतीही तक्रार नाही,’ असा समंजस सूर घेतला. दुसरीकडे मुलीला सोबत नेण्यावर ठाम असलेल्या सासूला त्यांच्याच गावातील राजकीय मंडळींनी मध्यस्थी करत समजावले. ‘मुलगा आणि मुलगी दोन्ही सज्ञान असून, त्यांचा विवाह कायदेशीर झाला आहे. त्यामुळे हे वास्तव स्वीकारणेच योग्य ठरेल,’ अशा शब्दांत लोकप्रतिनिधींनी तिची समजूत काढली.