विरार - भरूच मेमू आज सकाळी 6.30 च्या सुमारास भिलाड येथे रुळावरून घसरली. सुरतच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन लाईनवर परिणाम होत आहे.
J & K Live : जम्मू-काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस रस्त्यावरून घसरली; अनेक जण जखमीजम्मू-काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील कंगन भागात मंगळवारी अमरनाथ यात्रेकरूंना घेऊन जाणारी भरधाव बस रस्त्यावरून घसरल्याने अनेक यात्रेकरू जखमी झाले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
Pune Live : दिवे घाट आज दुपारी बंद राहणारपुणे सासवड मार्गावरील दिवे घाटात रस्ता रुंदीकरणासाठी ब्लास्टिंग करण्यात येणार आहे. यामुळे आज दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत दिवे घाट बंद राहणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Mumbai Live : महालक्ष्मी एक्सप्रेसच्या डब्याला आग, प्रवाशांमध्ये घबराटकर्जतजवळ रेल्वे पोहोचताच डब्यातून धूर येऊ लागल्याने प्रवाशांमध्ये घबराट. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. फायर अलार्म वाजताच झोपेत असलेल्या प्रवाशांची एकच धावपळ.
CJP Live : इतका मोठा अन्याय-अत्याचार करणाऱ्या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार आहे का? कॉक्रोच जनता पार्टीचा सवालइतका मोठा अन्याय-अत्याचार करणाऱ्या सरकारला सत्तेत राहण्याचा काही अधिकार आहे, याची तुम्ही कल्पना करू शकता का? असा सवाल सीजेपीने सोशल मीडिया पोस्टद्वारे केला आहे. हे सरकार प्रत्येक टप्प्यावर लोकांना विविध प्रकारे त्रास देत आहे,प्रयागराजमध्ये विद्यार्थ्यांना अटक करून त्यांचा छळ केला जात आहे,प्रयागराज पोलिसांनीही दिल्ली कराराचे पालन केले पाहिजे, असे पोस्टमध्ये म्हटले आहे.