काही होमिओपॅथी डॉक्टर MMC (महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल) यांच्याकडे ठिय्या आंदोलन करून नोंदणी घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा IMA चा आरोप आहे. या दबावाला बळी पडून BHMS चिकित्सकांना एकही नोंदणी देण्याच्या सरकारने प्रयत्न करू नये, अशी IMAची मागणी आहे. यासाठी आय एम ए महाराष्ट्र राज्य, MARD, तसेच इतर समविचारी वैद्यकीय संघटनांनी सरकार ने असा कोणताही निर्णय पुढे नेल्यास, या संघटनाचे सदस्य डॉक्टर तात्काळ सेवा बंद आंदोलन सुरू करतील, असा इशारा इंडिया मेडिकल असोसिएशनने दिला आहे.
पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती द्या, मुख्यमंत्र्यांचे शासनाला आदेशपुण्यातील बहुप्रतिक्षीत उच्च द्रूतगती वर्तुळाकार मार्गासाठी (एचसीएमटीआर) शासकीय जागा महापालिकेची अडवणूक न करता मोफत हस्तांतरण करा, रिंगरोडसाठी रोख मोबदला द्या, पाताल लोक प्रकल्पासाठी बोगद्यांच्या अलाईमेंट तज्ज्ञांकडून तपासून घ्या असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शासनाच्या विविध विभागाला दिले आहेत. या तिन्ही प्रकल्पाच्या उच्चस्तरीय समितीची पहिली बैठक झाल्याने या प्रकल्पांना बुस्ट मिळाले आहे.
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पाच बोगदे, पीएमआरडीए रिंगरोड आणि एचसीएमटीआर या तीन प्रकल्पांसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत.
राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमीराज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे जुलैच्या अवघ्या सहा दिवसात 144 तालुक्यात 100 टक्के पावसाची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण 355 पैकी 144 तालुक्याने जुलैची पावसाची शंभर टक्के सरासरी गाठली आहे. 95 तालुक्यात 50 टक्के तर 39 तालुक्यात 25 ते 50 टक्के इतका पाऊस झाला आहे. जुलैमध्ये एकही तालुका रेड झोन मध्ये नाही मुंबई आणि कोकण मध्ये महाराष्ट्राने सरासरी गाठली आहे. मराठवाडा आणि विदर्भात मात्र पावसाने सरासरीखूप कमी असल्याची हवामान विभागाची माहिती आहे.
राजधानी दिल्लीत आता राजकीय घडामोडींना वेगराष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकर यांनी केंद्रीय मंत्री अमित शहांची भेट घेतली त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि बजरंग सोनावणे हे अमित शहांच्या भेटीला पोहोचले यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चांना उदाहरण आलं आहे.
पुण्यातील दिवे घाट आज दुपारी १२ ते २ पर्यंत बंददिवे घाट येथील रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी करण्यात येणाऱ्या ब्लास्टिंगसाठी रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. आज दुपारी १२ पासून वाहनचालकांसाठी घाट राहणार बंद असेल तर या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद राहणार असल्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे प्रशासनाने आवाहन केलं आहे.