नागपूर : काही दिवसांची विश्रांती घेऊन आता पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावायला सुरुवात केली आहे. हवामान विभागाने नागपूरला सध्या यलो अलर्ट दिला आहे. शहरी भागात सध्या चांगलाच पाऊस कोसळतो आहे.
आता हवामान विभागाने पावासाचा नवा अंदाज व्यक्त केला आहे. या अंदाजानुसार पुढील 78 तासांमध्ये विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या अंदाजानुसार काही भागात 200 एमएम पर्यंत पाऊस पडू शकतो.
गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया शंभर ते दीडशे मिलिमीटर पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट आहे. तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टसुद्धा असणार आहे.
विदर्भातले गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर यांच्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे. नागपूर आणि वर्धा या दोन जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे. त्यामुळे या जिल्ह्यांतील नागरिकांनी स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागपूरला 29 जुलै आणि 30 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट असणार आहे. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या ठिकाणी रेड अलर्ट असेल. हा हवामान अंदाज लक्षात घेऊनच शेतकऱ्यांनी कामाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.