Viral Playing XI After India Test Squad: भारतीय कसोटी संघाच्या निवडीनंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू झाली आहे.
अनेक चाहत्यांचं म्हणणं आहे की, रणजी आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना अजूनही पुरेशी संधी मिळत नाही.
याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एका Playing XI ची पोस्ट व्हायरल होत आहे. या संघात अभिमन्यू ईश्वरन, ऋतुराज गायकवाड गायकवाड, रजत पाटीदार, सरफराज खान, करुण नायर, ईशान किशन, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, हर्ष दुबे, औकिब नबी आणि मोहम्मद शमी यांचा समावेश करण्यात आला आहे. या संघाचं नेतृत्व रजत पाटीदारकडे देण्यात आलं आहे.
View this post on Instagram
ही पोस्ट शेअर करताना अनेकांनी थेट बीसीसीआयवर टीका केली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना दुर्लक्षित केलं जातं आणि त्यामुळेच भारतीय संघाची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी घसरतेय, असा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.
अभिमन्यू ईश्वरन, सरफराज खान, करुण नायर, रुतुराज गायकवाड, हर्ष दुबे आणि औकिब नबी यांनी गेल्या काही वर्षांत देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने दमदार कामगिरी केली आहे. तरीही त्यांना अपेक्षेइतक्या संधी मिळालेल्या नाहीत. त्यामुळे या खेळाडूंना आता भारतीय संघात स्थान द्यावं, अशी मागणी चाहत्यांकडून होत आहे.
मात्र, दुसरीकडे काही चाहत्यांचं मत वेगळं आहे. त्यांच्या मते, फक्त रणजीत धावा केल्या किंवा विकेट घेतल्या म्हणून लगेच भारतीय संघात जागा मिळत नाही. संघ निवडताना खेळपट्टी, प्रतिस्पर्धी, फिटनेस, अनुभव आणि संघाचं संतुलन या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो.
Saransh Jain: वडिलांनी मुलासाठी कॅन्सरच लपवला! आज तोच खेळाडू टीम इंडियात; भावूक कहाणी डोळे पाणावेलसध्या ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली असून क्रिकेट चाहत्यांमध्ये यावर जोरदार चर्चा रंगली आहे. आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चमकणाऱ्या खेळाडूंना पुढच्या कसोटी मालिकांमध्ये संधी मिळते का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.