'ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट' अशी ओळख असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बनावट पदवी प्रमाणपत्र देण्याचे कथित रॅकेट सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, एका रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला असून विद्यापीठ प्रशासनाने संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात अंतर्गत चौकशी सुरू केली आहे.
महेश कदम हे रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मुलाच्या उच्च शिक्षणाबाबत माहिती घेण्यासाठी ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गेले होते. त्यावेळी विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागातील रमेश मुखेकर यांनी इतर काही साथीदारांसह तीन लाख रुपयांत बीकॉमची डिग्री मिळवून देण्याची तयारी दर्शवल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Ayodhya Donation Scam: बँकेने दिलेल्या खुर्ची-टेबलाच्या व्यवस्थेमुळेच राम मंदिरात चोरी झाली? चंपत राय यांच्या कथित पत्रामुळे नवा ट्विस्टयानंतर महेश कदम यांना 'युनिव्हर्सिटी ऑफ पुणे' या नावाचे बीकॉम पदवी प्रमाणपत्र देण्यात आले. मात्र, विद्यापीठाचे अधिकृत नाव 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ' असताना प्रमाणपत्रावर वेगळे नाव का आहे, असा संशय त्यांना आला. एवढेच नव्हे तर त्यांना वेगवेगळ्या वर्षांची चार पदवी प्रमाणपत्रे दाखवण्यात आल्याने त्यांचा संशय अधिकच बळावला.
यानंतर महेश कदम यांनी हा संपूर्ण प्रकार विद्यापीठ प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला आहे. संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. तसेच कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडे लेखी तक्रार सादर करून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.
राम मंदिर दानचोरी : आरोपींकडे लाखोंची रोकड अन् अमेरिकन डॉलर; मोजणी कक्षातून टॉयलेटमध्ये लपवत होते पैसे, तिथून...मात्र, या तक्रारीनंतरही तत्काळ कारवाई झाली नाही. जवळपास महिनाभर पाठपुरावा केल्यानंतर अखेर विद्यापीठ प्रशासनाने रमेश मुखेकर आणि इतर संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात खातेअंतर्गत चौकशी सुरू केली आहे. चौकशीत आरोप सिद्ध झाल्यास संबंधितांविरोधात फौजदारी गुन्हाही दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.