केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने देशातील कोट्यवधी सदस्यांना एक आनंदवार्ता दिली आहे. गेल्या एक वर्षांपासून युझर्स हे एटीएम कार्ड आणि युपीआयच्या माध्यमातून पीएफ काढण्याच्या सुविधेची वाट पाहत आहेत. पीएफ क्लेम स्टेलमेंट युपीआयशी जोडण्याची सुविधा बऱ्याच काळापासून प्रलंबित आहे. ही सुविधा सुरू करण्याचा नवीन तारीख आणि त्याला का उशीर होत आहे याची कारणं समोर आली आहेत. EPFO ने त्यांची बहुप्रतिक्षित UPI-Linked Claim Settlement सुविधा सध्या पुढे ढकलली आहे. पण ही योजना बारगळली नाही, ती लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
काय आहे अडचण?
EPFO ने डिजिटल प्लॅटफॉर्म अत्याधुनिक करण्यासाठी CITES 2.01 (Centralised IT Enabled Services) नावाची नवीन सुविधा सुरू केली आहे. ही सुविधा अजून अपग्रेड करण्यात येत आहे. पीएफशी संबंधित सेवा अजून गतिमान करणे, ही सुविधी सुटसुटीत आणि सोपी करणे, डिजिटल करणे हा त्याचा उद्देश आहे. पण नवीन सुविधेनंतर अनेक कर्मचाऱ्यांनी त्याविषयी तक्रारीचा सूर आळवला.
ही सुविधा सुरू झाल्यापासून EPF अकाऊंटचा डेटा दिसत नाही
पोर्टलवर लॉगिन करण्यास मोठी अडचण येत आहे
साईट मंदावल्याने विविध सेवेसाठी वाट पाहावी लागते
PF क्लेम प्रक्रियेला उशीर होत आहे
अशा तक्रारीचा सुरू समोर आल्यानंतर हा त्रुटी दूर करण्याचे काम सुरू झाले आहे. EPFO च्या UPI आधारित क्लेम सुविधासाठी अजून काही कालावधी लागणार आहे. त्रुटी दूर झाल्यावर देशभरातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांना सर्व सुविधा ऑनलाईन मिळतील. त्यांना ईपीएफओ कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज नसेल.
आता कधी मिळणार सुविधा?
EPFO सध्या नवीन पोर्टल स्थिरस्थावर करण्याकडे लक्ष देत आहे. येत्या ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तांत्रिक अडचणी दूर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर UPI-Linked Claim Settlement सुविधा सुरू करण्यात येणार आहे. अर्थात EPFO ने अजून त्याविषयीची अंतिम तारखेची अधिकृत घोषणा केलेली नाही. माहितीनुसार, ही सुविधा आर्थिक वर्ष 2026 च्या अखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे. पण अद्याप याविषयीची माहिती समोर आलेली नाही. लवकरच ही सुविधा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
EPFO 3.0 अंतर्गत काय बदल?
क्लेम सेटलमेंटची प्रक्रिया गतिशील होईल
डिजिटल सेवांचा विस्तार होईल
कागदी प्रक्रियेला ब्रेक लागेल
युपीआय आणि एटीएममार्फत पीएफ काढता येईल
सदस्यांना डिजिटल सेवा मिळतील