डोनाल्ड ट्रम्प रागात, इराणला धमकी, थेट होर्मुज खाडी तब्बल 3 जहाजांना..
GH News July 30, 2026 11:14 AM

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव पुन्हा वाढला. त्यामध्येच अमेरिकेकडून इराणवर मोठे हवाई हल्ले करण्यात आले. होर्मुज खाडीच्या जवळ हे हल्ले करण्यात आले. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले की, आम्ही इराणवरील हल्ले थांबवत आहोत. त्यानंतर पुन्हा एकदा हल्ल्यांना सुरूवात करण्यात आली. त्यानंतर होर्मुद खाडीत आयआरजीसीकडून तीन तेल टँकर्सना टार्गेट करत हल्ले करण्यात आली. होर्मुज खाडी पुन्हा एकदा तणाव वाढल्याचे दिसतंय. इराणच्या खुझेस्तान प्रांतातील अहवाझ, अबादान, शादगन, अरवंदकेणार या शहरांलगतच्या भागांना क्षेपणास्त्र टाकण्यात आली. पुन्हा एकदा दोन्ही देशात तणाव वाढला. जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी तळावर मोठा हवाई हल्ला इराणने केला. त्यानंंतर अमेरिकेचा जळफळाट उठला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचे आदेश दिले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते की, इराणला अमेरिका जबरदस्त प्रत्युत्तर देईल. इराणने काही आखाती देशातही हल्ले केले. सध्या पश्चिम आशियात तणाव वाढला आहे. इराकला या युद्धात अमेरिकेने इराणविरोधात हाताला पकडले. इराणला एकटे पाडण्याचा डाव डोनाल्ड ट्रम्प यांचा आहे. काही दिवसांपूर्वीच इराकचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीला पोहोचले होते.

डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना म्हटले की, अमेरिका इराणविरुद्ध कठोर कारवाई करेल. आम्ही त्यांना चोख प्रत्युत्तर देऊ..  आता त्यांना एका मोठ्या हल्ल्याचा सामना करावा लागणार आहे. ट्रम्प यांनी दावा केला की इराणचा हल्ला अचानक झाला होता. अमेरिकेला याला उत्तर देण्यासाठी अवघे काही मिनिटे मिळाली होती.

अमेरिकेच्या संरक्षण यंत्रणांनी सर्व क्षेपणास्त्रे अगोदर पाडली. इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव म्हणजे जगाचे टेन्शन वाढते. पुन्हा एकदा जागतिक बाजाराज कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ होऊ शकते. इराण आणि अमेरिका युद्धाचा फटका संपूर्ण जगाला बसत आहे. मात्र, हे युद्ध काही थांबण्याचे नाव घेत नाही. अनेक देशांना या युद्धात मध्यस्थी करण्याचाही प्रयत्न केला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.