Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?
esakal July 31, 2026 04:45 AM

Commonwealth Games 2026 men's shot put final results: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताच्या गोळाफेक पटूंकडून पदकाची अपेक्षा होती. मात्र तजिंदरपाल सिंग तूर आणि समरदीप सिंग या दोघांनाही अंतिम फेरीत निराशाजनक कामगिरी करावी लागली. अनुभवी तजिंदरपालने सर्वोत्तम प्रयत्न करतही अव्वल तीनमध्ये स्थान मिळवता आले नाही आणि त्याला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. दुसरीकडे, समरदीप सिंगने अंतिम फेरीत सातवे स्थान पटकावले. नायजेरियाच्या चुक्वूएबुकाने ( २१.०७ मी.) सुवर्ण, न्यूझीलंडच्या टॉम वॉल्शने ( २१.०३ मी.) रौप्य, तर इंग्लंडच्या स्कॉट लिनकॉल्ने ( २०.९९ मी.) कांस्यपदक जिंकले.

भारताच्या समरदीप सिंगने गोळाफेकीच्या पहिल्या प्रयत्नात १९.५६ मीटर लांब फेक करून चौथे स्थान पटकावले. तेच तजिंदरपाल सिंग तूरने २०.०६ मीटर लांब गोळा फेकून तिसऱ्या स्थानावर झेप घेतली. पहिल्या प्रयत्नानंतर तजिंदरपाल व समरदीप हे दोन्ही भारतीय टॉप फाईव्हमध्ये होते. समरदीपने दुसऱ्या प्रयत्नात सुधारणा करताना १९.६३ मीटर लांब गोळा फेकला. न्यूझीलंडचा टॉम वॉल्श ( २१.०३), इंग्लंडचा स्कॉट लिनकॉल्न ( २०.७० ) आणि नायजेरियाच्या चुक्वूएबुका एनेक्वेची ( २०.४८) हे आघाडीवर होते.

Commonwealth Games 2026: भल्याभल्यांना टक्कर दिली, भारताची २० वर्षांची वाघिण जगाला भिडली! कोण आहे मार्टिना देवी मैबाम? थोडक्यात हुकले पदक

समरदीप सुधारणा करताना तिसऱ्या प्रयत्नात २०.०३ मीटरपर्यंत पोहोचला. आशियाई स्पर्धेतील सलग दोन सुवर्णपदक जिंकणाऱ्या तजिंदरपालला राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकता आलेले नाही. २०१८ मध्ये त्याला आठव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. त्याने २०१८ जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत (२०.७५ मीटरचा तत्कालीन रेकॉर्ड) आणि २०२३ हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. तजिंदरपालने टोकियो २०२० आणि पॅरिस २०२४ अशा दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. चुक्वूएबुकाने २०.८२ मीटर गोळाफेक करून तिसरे स्थान मजबूत केले, तर तजिंदरपाल व समरदीप यांची अनुक्रमे सहाव्या व सातव्या क्रमांकावर घसरण झाली.

Commonwealth Games 2026: नाशिकच्या दिलीप गावितला 'सुवर्ण'; Goosebumps आणणारा Video! २ रौप्यपदकांसह भारताने सहाव्या दिवशी पक्की केली ६ पदकं

तजिंदरपालने तिसऱ्या प्रयत्नात २०.२७ मीटर लांब गोळा फेकला. पहिल्या तीन प्रयत्नानंतर दोन्ही भारतीयांनी स्वतःला टॉप ८मध्ये कायम राखले, म्हणून त्यांना आणखी तीन प्रयत्न मिळाले. तीन फेरीनंतर १२ पैकी केवळ ८ स्पर्धेक पुढे पदकासाठी प्रयत्न करतात. पण, तजिंदरला २०.२७ मीटरसह पाचवे, तर समरदीपला २०.०३ मीटरसह सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

दरम्यान, प्रवीण चित्रवेल (दुसरा) आणि सेल्वा प्रभू (तिसरा) पुरुष तिहेरी उडीच्या अंतिम फेरीत दाखल झाले आहेत. त्याआधी भालाफेकीत नीरज चोप्रा, रोहित यादव व युधवीर सिंग यांनी फायनलमधील आपली जागा पक्की केली. अनिमेश कुजूरला २०० मीटर उपांत्य फेरीत २०.६५ सेकंदाची वेळ नोंदवता आली आणि तो फायनलसाठी पात्र ठरू शकला नाही.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.