Mumbai Crime News: मुंबईतील दादरमधून (Dadar) एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात भवानी शंकर रोडवरील एका सोसायटीत कौटुंबिक वादातून मुलानेच जन्मदात्या आईवर चाकूने वार करून तिची हत्या (Dadar Crime News) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रेझीना क्रुझ फर्नांडीस यांच्यावर त्यांचा मुलगा एडवर्ड क्रुझ फर्नांडीस (वय 41) याने नाकावर आणि छातीवर चाकूने वार केल्याचा आरोप आहे. तर गंभीर जखमी अवस्थेत त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. (Dadar Crime News)
दरम्यान, घटनेची माहिती मिळ्ताच पोलसांचे (Dadar Police) पथक घटनास्थळी दाखल होऊन तपस सुरु केला असता, या प्रकरणी दादर पोलिसांनी एडवर्ड फर्नांडीस याला 18 ऑगस्ट रोजी सकाळी 6.21 वाजता अटक केली. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेला चाकू देखील हस्तगत करण्यात आला असून त्याच्यावर यापूर्वी कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नसल्याची माहिती आहे. मात्र किरकोळ वादातून केलेल्या आईच्या हत्येनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त करताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या, "हे कृत्य अत्यंत निंदनीय आणि माणुसकीला काळीमा फासणारे आहे. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत संशयित तरुणाला ताब्यात घेतले असून पुढील तपास वेगाने सुरू आहे.या प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी, यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जावा, अशी विशेष विनंती मी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे.'' अशी माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिलीय.
Sunetra Pawar : पीडित कुटुंबाची लवकरच घेणार भेट
पीडित कुटुंबाच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचे स्पष्ट करत उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की, त्या लवकरच स्वतः पिंपळवंडी येथे भेट देऊन पीडित कुटुंबाची भेट घेणार आहेत. असेही सुनेत्रा पवार म्हणाल्या.
इतर महत्वाच्या बातम्या