केरळची काझिया लिझ मेजो ठरली 'मिस युनिव्हर्स इंडिया 2026' ची मानकरी; 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेतही करणार भारताचे प्रतिनिधित्व
विशाल देवकर August 24, 2026 11:43 AM

Miss Universe India 2026 Kaziah Liz Mejo :  'मिस युनिव्हर्स इंडिया 2026' ची (Miss Universe India 2026) विजेती म्हणून केरळच्या (Kerala) काझिया लिझ मेजोची (Kaziah Liz Mejo) निवड झाली आहे. राजस्थानमधील जयपूर येथे झालेल्या भव्य अंतिम सोहळ्यात, 'मिस युनिव्हर्स इंडिया 2025' मानिका विश्वकर्मा (Manika Vishwakarma)हिने आपल्या उत्तराधिकार्याला मुकुट परिधान करून हा प्रतिष्ठित राष्ट्रीय किताब अधिकृतपणे सोपवला. या विजेतीला केवळ राष्ट्रीय किताबच मिळाला नाही, तर तिला आणखी एक महत्त्वाची संधीही मिळाली आहे. 19 वर्षीय काझिया नोव्हेंबरमध्ये पोर्तो रिको येथे होणाऱ्या 75 व्या 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेत (75th Miss Universe in Puerto Rico) भारताचे प्रतिनिधित्व करेल आणि देशाचा सौंदर्य स्पर्धेतील वारसा आंतरराष्ट्रीय मंचावर नेईल.

Manika Vishwakarma Kaziah Liz Mejo : मानिका विश्वकर्मानंतर काझिया लिझ मेजो ठरली 'मिस युनिव्हर्स इंडिया 2026'

अंतिम मूल्यमापनानंतर, तमिळनाडूची वैष्णवी गणेश आणि गुजरातची अनुश्री सातवळेकर यांनी उर्वरित स्थाने पटकावली आहे. अशा प्रकारे या वर्षीच्या स्पर्धेतील 'टॉप 3' स्पर्धकांची निवड पूर्ण झाली. या अंतिम सोहळ्यात 52 स्पर्धक सहभागी झाले होते. ज्यांनी अनेक महिन्यांच्या ऑडिशन्स, मुलाखती आणि प्राथमिक फेऱ्यांमधून आपले स्थान निश्चित केले होते. अंतिम विजेतीची निवड होण्यापूर्वी प्रत्येक स्पर्धकाला मूल्यमापनाच्या अनेक टप्प्यांतून जावे लागले. या सोहळ्यासाठी एका प्रतिष्ठित परीक्षकांचा (ज्युरी) गट उपस्थित होता. ज्याचे नेतृत्व भारताची पहिली 'मिस युनिव्हर्स' सुष्मिता सेन हिने केले. तिने 1994 मध्ये हा आंतरराष्ट्रीय किताब जिंकला होता. या परीक्षकांच्या पॅनेलमध्ये 'मिस युनिव्हर्स इंडिया'च्या माजी विजेत्या सेलिना जेटली, उर्वशी रौतेला आणि रिया सिंघा यांचाही समावेश होता. तसेच, प्रज्ञा कपूर, विशा लाढिया, ॲना ब्लँको, डॉ. स्तुती खरे शुक्ला आणि 'ग्लॅमानंद ग्रुप'चे अध्यक्ष हे देखील या पॅनेलचा भाग होते.

Miss Universe in Puerto Rico: काझिया लिझ मेझो मिस युनिव्हर्स 2026 स्पर्धेत करणार भारताचे प्रतिनिधित्व

मिस युनिव्हर्स इंडिया 2026 स्पर्धेची घोषणा पहाटे 2.30 वाजता करण्यात आली. अंतिम फेरीत पोहोचलेल्या पहिल्या पाच स्पर्धकांमध्ये तामिळनाडूची वैष्णवी गणेश, महाराष्ट्राची तेजस्विनी श्रीवास्तव, केरळची काझिया लिझ मेझो, गुजरातची अनुश्री सातवलेकर आणि उत्तराखंडची अनुभा वशिष्ठ यांचा समावेश होता. केरळच्या काझिया लिझ मेझोने अंतिम फेरीत 40 सेकंदात आपले समारोपाचे भाषण सादर करण्याचे आव्हान जिंकले आणि ती मिस युनिव्हर्स इंडिया 2026 च्या मुकुटाची मानकरी ठरली. मनिका विश्वकर्मा यांनी काझिया लिझ मेझोला मुकुट प्रदान केला. मेझो आता नोव्हेंबर 2026 मध्ये प्युर्टो रिको येथे होणाऱ्या मिस युनिव्हर्स 2026 स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करेल.

इतर महत्वाच्या बातम्या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.