Baba Ramdev on Kangana Ranaut: भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना राणावतच्या 'जनरेशन गटर' या वक्तव्यावरून निर्माण झालेला वाद अजूनही सुरुच आहे. योगगुरू बाबा रामदेव यांच्या वक्तव्यानंतर कंगनाने "बाबा, माझ्या जवानीची किंवा माझ्या बेडरूमची स्वप्ने पाहू नका" अशी खोचक टिप्पणी केली होती. आता बाबा रामदेव यांनी पुन्हा भडकले असून कंगनावर पलटवार केला आहे.
हरिद्वारमध्ये बाबा रामदेव म्हणाले की, मला हा वाद वाढवायचा नव्हता. त्यांनी सांगितले की "स्वामी रामदेव कोण आहेत हे देशाला माहीत आहे. रामदेव यांचे योगदानही देशाला माहीत आहे. त्यामुळे, मला क्षुल्लक लोकांवर भाष्य करायचे नाही." बाबा रामदेव यांनी कंगनाच्या 'जनरेशन गटर' या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, 'जनरेशन-झेड'ला 'गटर' म्हणणे हे विकृत मनाचे लक्षण आहे. त्यांनी कंगनाच्या क्षमता, बालपण, तारुण्य आणि भूतकाळातील कामगिरीवरही भाष्य केले होते. यानंतर कंगनाने इंस्टाग्राम स्टोरीद्वारे रामदेव यांना प्रत्युत्तर दिले होते.
कंगनाने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले की, "सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे तरुण हिंदू महिलांचे वागणे. त्यांना स्वतंत्र, करिअर-केंद्रित महिलांच्या जीवनाचे अनुकरण करायचे आहे, पण त्यांना ते स्वातंत्र्य मिळवायचे नाही. ज्या महिला खऱ्या अर्थाने स्वतंत्र असतात, त्या बंडखोर निर्णय घेतात, ठाम मते व्यक्त करतात, परंपरा मोडून काढणारे करिअर निवडतात आणि घेतलेल्या प्रत्येक निर्णयाची जबाबदारी घेतात, कारण त्या आपले आयुष्य स्वतंत्रपणे जगतात. त्या हे सर्व आपल्या आई-वडिलांच्या किंवा कुटुंबाच्या जीवावर करत नाहीत. ही तथाकथित पाश्चात्त्य विचारसरणीच्या भारतीय महिलांची नवीन पिढी आहे, जिला मी 'जनरेशन गटर' म्हणते."
कंगनाच्या पोस्टनंतर बाबा रामदेव यांचा संताप झाला. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, कंगनाच्या 'जनरेशन झेड'बद्दल उत्तर देताना बाबा रामदेव म्हणाले, "त्यांची शैक्षणिक पात्रता काय? बालपण कसं होतं? तारुण्य कसं होतं? त्यांचा पूर्वीचा कारनामा काय होती? मला अशा लोकांबद्दल बोलायचं नाही. कोणत्याही देशातील तरुणांना, 'जनरेशन झेड'ला, गटार म्हणणं हे विकृत मनाचं लक्षण आहे. हे चुकीचं आहे. जे काही घडत आहे, त्याची त्यांच्या पक्षाच्या सदस्यांनी दखल घेतली पाहिजे." कंगना योगाची चाहती आहे का, असे विचारल्यावर बाबा रामदेव म्हणाले, "जर ती माझी, योगाची प्रशंसा करत असेल, तर मी तिचे इथले गुन्हे झाकावेत का?" असाही सवाल त्यांनी केला होता.
बाबा रामदेव यांची टीका कंगनाला सहन झाली नाही. तिने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे बाबा रामदेव यांना प्रत्युत्तर दिले, "बाबा, माझ्या तारुण्याबद्दल किंवा बेडरूमबद्दल दिवसा स्वप्न पाहू नका. अफवा आणि गप्पांच्या आधारावरच कोणी असा विचार करू शकते. निदान मला तरी खोट्या किंवा फसव्या वैद्यकीय दाव्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाने कधीही फटकारलेले नाही. त्यामुळे मला चारित्र्यावर उपदेश करू नका. तुमचे चारित्र्य काहीही असो, माझे त्याहून खूप चांगले आहे. कोणताही घोटाळा आढळलेला नाही."
इतर महत्वाच्या बातम्या