Ketan Agrawal Pune Lohagad Case Siya Goyal: पुणे जिल्ह्यातील लोहगड येथील केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील (Ketan Agrawal Pune Lohagad Case) मुख्य आरोपी सिया गोयल (Siya Goyal) सध्या तुरंगात असून तिला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा संशय रिपब्लिकन सोशलिस्ट पक्षाने व्यक्त केला आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करावी आणि पोलिसांनी वेळेत तपास पूर्ण करून फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवावा, अशी मागणी देखील रिपब्लिकन सोशलिस्ट पक्षाने (Republican Socialist Party) केली आहे. बुधवारी (दि. 26) या विषयावर पुण्यातील पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदमध्ये ही मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, पैशांच्या आणि प्रभावाच्या बळावर आरोपींना जेलमध्ये अशा सवलती मिळणे अत्यंत गंभीर असून, यामुळे संपूर्ण तपास प्रक्रियेवर आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत आरोपींविरोधात कठोर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली. या पत्रकार परिषदेला रिपब्लिकन सोशलिस्ट पक्षाचे राहुल डंबाळे, अपर्णा दुबे, अॅड. जावेद जमादार, रुद्राणी जावळकर, कैलास देवकर, उषा आवळे, राहुल नागटिळक उपस्थित होते.
Republican Socialist Party : दोषी आढळणाऱ्या जेल अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई व्हावी
पोलीस प्रशासनाने कोणत्याही बाह्य दबावाला बळी न पडता या प्रकरणाचा तपास ठराविक वेळेत पूर्ण करावा आणि न्यायालयात भक्कम पुराव्यांसह लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल करावे, अशी देखील मागणी रिपब्लिकन सोशलिस्ट पक्षाने केली आहे. केतन अग्रवाल यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर अशी शिक्षा व्हावी, यासाठी हा खटला 'फास्ट ट्रॅक कोर्टात' चालवून त्वरित निकाल द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तर आरोपी सिया गोयल हिला जेलमध्ये मिळणाऱ्या सुविधांची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी आणि यात दोषी आढळणाऱ्या जेल अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई व्हावी, ही देखील मागणी यावेळी करण्यात आलीय.
Pune Ketan Agrawal Case : फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा होत नाही, तोपर्यंत हा संघर्ष असाच सुरू राहील
दरम्यान, हा लढा केवळ केतन अग्रवाल यांच्या कुटुंबाचा नसून गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठीचा आहे. जोपर्यंत केतनच्या मारेकऱ्यांना फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा होत नाही, तोपर्यंत हा संघर्ष असाच सुरू राहील, असा ठाम निर्धार देखील यावेळी करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणी पुढे नेमकी काय घडामोड घडते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Ketan Agrawal news: केतन अगरवालच्या हत्येनंतरचा घटनाक्रम
- 18 जून केतन अगरवाल पाय घसरुन दरीत पडल्याचा बनाव
- दरीतून मृतदेह बाहे काढणाऱ्या शिवदुर्ग रेस्क्यू टीमकडे 'अशी' घटना घडेल का? पोलिसांची विचारणा आणि पहिला संशय
- सर्व विधी पार पडल्यावर 21 जूनला कुटुंबीय लोहगडावर पोहचले. केतनचा पडून मृत्यू झाला नसल्याचा पोलिसांकडे दावा
- मग सिया सांत्वनासाठी केतनच्या घरी आली, तेंव्हा केतनची बहीण संजनाने सियावर प्रश्नांची सरबत्ती केली.
- लोहगडावर तुम्ही काय-काय केलं? कुठं-कुठं फोटो काढले? फोटो काढताना पाय नेमका कसा घसरला? तेंव्हा तू खरंच फोटो काढत होतीस का? असे एकणानेक प्रश्न विचारताचं ती अनुत्तरित झाली
- बहीण संजनाच्या प्रश्नांनी सियावर संशय वाढला.
- वडील आणि बहिणींनी उपस्थिती केलेली शंका, दिलेले जबाब यातून तपासाची चक्र वेगाने हलली.
- जबाबात चेतन चौधरीचं नाव आलं. सिया आणि चेतनचे सिडीआर तपासण्यात आले.
- सिया आणि चेतनमध्ये गेल्या वर्षभरात 2004 वेळा फोन कॉल झाल्याचं आणि तीनशेहुन अधिक तास संवाद झाल्याचं उघड
- पण 18 जूनला तेजसचं लोकेशन लोहगडावर आढळलं नाही.
- एक तरुण भर उन्हात हुडी, हेडफोन आणि मास्क घालून लोहगडाच्या सीसीटीव्हीत आढळला.
- तोचं तरुण पुढं जाऊन सियाला काहीतरी खुनवत असल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं.
- हा तरुण चेतन असेल तर मग फोन लोकेशन मार्केटयार्ड का दाखवतोय? मग पोलिसांची 18 जूनला चेतनच्या फोनवर आलेल्या व्यक्तींकडे विचारणा.
- चेतनचा फोन दुकानातील कामगारने उचलल्याचे आणि कामगाराचा फोन घेऊन चेतन लोहगडावर आल्याचं स्पष्ट
- 22 जूनच्या रात्री पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने तेजसला ताब्यात घेतलं.
- तेजसला पोलिसी खाक्या दाखवताच सियाचं ही बिंग फुटलं.
इतर महत्वाच्या बातम्या