Nagpur Aadivasi Student Protest: आमचं शैक्षणिक नुकसान होत आहे, विविध स्पर्धा परीक्षांची तयारी थांबली आहे, आंदोलन लांबल्यामुळे घरातून विचारणा होऊ लागली आहे, अशी प्रतिक्रिया देत नागपुरातील अप्पर आदिवासी आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलनावर बसलेल्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांनी (Devendra Fadnavise) आमच्या आंदोलनाकडे लक्ष घालावे, अन्यथा आमच्या शैक्षणिक नुकसानाची जबाबदारी त्यांनी घ्यावी, अशी मागणी केली आहे. नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन (Aadivasi Student Protest) 13 ऑगस्टपासून सुरू होते. 22 ऑगस्ट रोजी आदिवासी विकास मंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर तेव्हा आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या विद्यार्थ्यांनी वसतिगृहातील कमाल वयोमर्यादा शिथिल करण्याचा आश्वासन शासनाकडून मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेतलं होतं. मात्र दोनच दिवसात विद्यार्थ्यांमध्ये मतभेद होऊन बहुतांशी विद्यार्थ्यांनी पुन्हा आंदोलन सुरू केले. गेले तीन दिवस नव्याने सुरू झालेले आंदोलन आदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त कार्यालयात सुरू आहे. कालही पुण्यात आदिवासी विकास मंत्री यांची चर्चा निष्फळ ठरली आहे. (Nagpur Aadivasi Student Protest)
Nagpur Aadivasi Student Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या 29 मागण्यासाठी आंदोलन
दरम्यान, सरकारने आतापर्यंत आमची फक्त वसतिगृहासाठीची वयोमर्यादा शिथिल करत त्या संदर्भातला जीआर रद्द करण्याची मागणी मान्य केली आहे. मात्र, वसतीगृहामध्ये सुधारणा करणे, आश्रम शाळा विद्यार्थ्यांसाठी जास्त सुरक्षित बनवणे, जपतलाई येथील सर्पदंशामध्ये मृत्युमुखी पडलेल्या मुलींच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची मदत करणे, आदिवासी विकास विभागात पद भरती करणे, डीबीटी पद्धत रद्द करून पूर्वीसारखीच पद्धत सुरू करणे, अशा विविध 29 मागण्या अजूनही पूर्ण झालेल्या नाही, त्यामुळे आमचं आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका या विद्यार्थ्यांनी जाहीर केली आहे.
Nashik Student Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आमरण उपोषणातील विद्यार्थी आंदोलकाची प्रकृती खालावली
आदिवासी विद्यार्थ्यांचे नाशिकच्या ईदगाह मैदान या ठिकाणी गेल्या चार दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तसेच सर्पदंशाने आदिवासी विद्यार्थिनींचा मृत्यू झाला, त्या पीडित कुटुंबाला प्रत्येकी एक कोटी रुपये आर्थिक मदत आणि राज्यातील आदिवासी आश्रम शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजांसाठी प्रशासनाकडून ठोस उपयोजना, तसेच विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सवलती आणि त्यात प्रशासनाकडून होणारी गैरसोय यासंदर्भात या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. विवेक गावित, लक्ष्मी जाधव आणि राहुल पावरा हे विद्यार्थी आमरण उपोषण करत आहे. यात आज राहुल पावरा या विद्यार्थ्यांची प्रकृती खालवल्याने त्याला तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे राज्यात विविध ठिकाणी आंदोलन सुरू आहे. नाशिकच्या ह्या आदिवासी विद्यार्थी आंदोलनस्थळी आमदार रोहीत पवार भेट देणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या