यशच्या 'टॉक्सिक'ने बिघडवला 'आवारापन 2'चा खेळ; 12 दिवस घौडदौड, पण 13 व्या दिवशी गती मंदावली, आकडा घसरला, किती कमावले?
भाग्यश्री कांबळे August 27, 2026 03:13 PM

Awarapan 2 Box Office Collection Day 13: इम्रान हाश्मी (Emraan Hashmi) अभिनीत 'आवारापन 2' (Awarapan 2) या सिनेमाची सध्या चर्चा सुरू आहे. या सिनेमाने 150 कोटींचा आकडा पार केला आहे. 'धुरंधर 2'  नंतर हा सिनेमा नुकताच 2026 मधील बॉलिवूडचा (Box Office Collection) दुसरा सुपरहिट चित्रपट ठरला आहे. या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाने 100 कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली आहे. दरम्यान, 'आवारापन 2' या सिनेमाच्या प्रदर्शनाच्या 13 व्या दिवशी रॉकिंग स्टार यशचा 'टॉक्सिक' हा सिनेमा रिलीज झाला आहे.  दरम्यान, 'टॉक्सिक सिनेमा रिलीज होताच, 'आवारापन 2' या सिनेमाची प्रेक्षकांमधली क्रेझ कमी झाली आहे.  'आवारापन 2' या सिनेमाने 13 व्या दिवशी किती कोटींचे कलेक्शन केले? जाणून घेऊयात. 

'आवारापन 2' या सिनेमाने 13 व्या दिवशी किती कोटींचा गल्ला जमवला? (Awarapan 2 Box Office Collection Day 13 Emraan Hashmi Film)

ओपनिंग डेपासून नितिन कक्कर दिग्दर्शित  'आवारापन 2' या सिनेमाच्या तिकिट खरेदीसाठी पहिल्या दिवसापासून गर्दी पाहायला मिळाली. एकूण 12 दिवसांत या सिनेमाच्या कमाईच्या जबरदस्त वाढ झाली असल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, बुधवारी 'आवारापन 2' या सिनेमाला 'टॉक्सिक सिनेमाशी स्पर्धा करावी लागली.  'टॉक्सिक' सिनेमामुळे 'आवारापन 2' या सिनेमाच्या कमाईत घट होत चालली आहे, अशी माहिती समोर आली आहे. सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्ट्सनुसार,   'आवारापन 2' या सिनेमाने प्रदर्शनाच्या 13 व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या बुधवारी  0.90 कोटींचे कलेक्शन केले आहे.

एकूण 13 दिवसांत या सिनेमाने 143.45 कोटींचे भारतात नेट कलेक्शन केले आहे. तर, एकूण 13 दिवसांत  भारतात 171.20 कोटींचे ग्रॉस कलेक्शन केले आहे. परदेशात 'आवारापन 2' चित्रपटाने 0.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ओव्हरसीज या सिनेमाने आतापर्यंत 31.55 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. वर्ल्डवाईड कलेक्शनबाबत बोलायचं झाल्यास, या सिनेमा  एकूण 13 दिवसांत 202.75 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. एकूण 13 दिवसांत 'आवारापन 2' या चित्रपटाने वर्ल्डवाईड  202.75 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे.   

'आवारापन 2' या सिनेमाच्या 13 व्या दिवसाच्या कमाईत मंदी पाहायला मिळाली. तरी देखील  सलमान खान अभिनीत 'बॉडीगार्ड' या सिनेमाच्या 142 कोटींच्या लाईफटाईफ कलेक्शनला मात दिली आहे. हा सिनेमा लवकरच 250 कोटींचा टप्पा गाठेल, असं बोललं जात आहे.  दरम्यान, भारतात 'आवारापन 2' हा सिनेमा 150 कोटींचा आकडा गाठू शकेल का? आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 'आवारापन 2' हा सिनेमा 'आवारापन' या सिनेमाचा सिक्वेल आहे.  नितिन कक्कर दिग्दर्शित या सिनेमात इम्रान हाश्मीसह दिशा पटानी मुख्य भूमिकेत आहे. प्रदर्शनापूर्वी या सिनेमाची जास्त चर्चा झालेली नाही. दरम्यान, 'आवारापन 2' या सिनेमाने चर्चाशिवाय बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये धुरळा उडवला.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'मला असं वाटतं की ब्रालेट...' क्रिती सेननच्या कपड्यांवर आक्षेप नाहीच, मग कोणती गोष्ट खटकली?

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.