Moon Venus Star News : आकाशात आज एक वेगळाच योगायोग पाहायला मिळाला मिळाला. खगोलप्रेमींचे लक्ष वेधून घेणारे मनोहक दृश्य आकाशात पाहायला मिळालं. आकाशात दिसणाऱ्या नाजूक चंद्रकोरीच्या अगदी जवळ तेजस्वी शुक्र ग्रह चमकत असल्याचे दृश्य सर्वांना पाहता आलं. या योगायोग नागरिकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे. अनेकांना हा नजारा पाहून फोटो काढण्याचा मोह आवरला नाही.
आकाशात खगोलप्रेमींचे लक्ष वेधून घेणारे मनोहारी दृश्य पाहायला मिळाले. आकाशात दिसणाऱ्या नाजूक चंद्रकोरीच्या अगदी जवळ तेजस्वी शुक्र ग्रह चमकत असल्याचे दृश्य नागरिकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपले. आज 14 सप्टेंबर रोजी चंद्र आणि शुक्र ग्रहाची जवळची युती झाली. या खगोलीय घटनेमुळे सूर्यास्तानंतर पश्चिमेकडील आकाशात चंद्रकोर आणि त्याच्या शेजारी चमकणारा शुक्र असा सुंदर नजारा पाहायला मिळाला. विशेष म्हणजे शुक्र हा आकाशातील सर्वाधिक तेजस्वी ग्रहांपैकी एक असल्याने तो चंद्राच्या शेजारी एखाद्या चमकत्या ताऱ्यासारखा स्पष्टपणे दिसत होता. या अनोख्या आकाशदर्शनाने नागरिक आणि खगोलप्रेमींमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे.
आकाशात आज एक मनमोहक खगोलीय दृश्य पाहायला मिळत आहे. अतिशय पातळ चंद्रकोर आणि तिच्या जवळ तेजस्वी दिसणारा शुक्र ग्रह (Venus) यांची सुंदर चंद्र-शुक्र युती आकाशप्रेमींचे लक्ष वेधून घेत आहे. नागरिकांना हे सुंदर दृश्य स्पष्ट पाहता आले. दरम्यान, आज नेमका काय योगायोग असावा असाल सवाल देखील नागरिक करताना दिसत आहेत.
आकाशात रात्रीच्या वेळी चंद्राच्या अगदी जवळ एक अत्यंत तेजस्वी प्रकाशमान ठिपका दिसून आल्याने नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता आणि कुतूहल निर्माण झाले आहे. सोशल मीडियावर या दृश्याचे व्हिडिओ आणि फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. कोणत्याही दुर्बिणीशिवाय उघड्या डोळ्यांनी दिसणाऱ्या या खगोलीय घटनेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
आजच्या या खगोलीय सोहळ्यात चंद्र आणि शुक्र एकमेकांच्या अतिशय जवळ आल्याने हे दृश्य विशेष आकर्षक ठरलं. खगोलशास्त्रीय गणनेनुसार दोन्ही वस्तूंचा परस्परातील कोनीय अंतरही अत्यंत कमी होतं. चंद्राच्या नाजूक कोरीसोबत तेजस्वी शुक्राची ही जोडी आकाशात काही काळच दिसत असल्याने अनेक खगोलप्रेमींनी या सुंदर क्षणाचं छायाचित्रणही केलं. आकाशात दिसणाऱ्या एका छोट्याशा ‘ताऱ्या’मागे दडलेलं हे वैज्ञानिक रहस्य आणि चंद्रासोबतची शुक्राची ही मनमोहक भेट आजच्या आकाशाचं आकर्षण ठरली आहे.