Sooraj Pancholi Breaks Silence on Disha Salian Case: दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याची पूर्व मॅनेजर दिशा सालियन (Disha Salian) हिचं मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सीबीआयकडून दाखल झालेल्या एफआयआरनंतर या केसच्या संबंधित जुनी नावेही चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहेत. या प्रकरणात अभिनेता सूरज पंचोली (Sooraj Pancholi) याचं देखील नाव चर्चेत आलं होतं. या प्रकरणावर आता सूरज पंचोलीने आपले मौन सोडले आहे. आपल्यावरील आरोपांवर त्याने उघडपणे भाष्य केलं आहे. सूरज पांचोलीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्याने आपली बाजू स्पष्ट केली आहे.
सूरज पांचोलीने सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. गेल्या काही वर्षांपासून विविध मीडिया रिपोर्ट्समधून त्याचे नाव कायम दिशा सालियन मृत्यू प्रकरणात ओढले जात होते. अभिनेत्याने या संबंधित एक पोस्ट देखील सोशल मीडियात शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्याने स्पष्टपणे सांगितलं की, त्याचा दिशा किंवा शिवसेना (UBT)नेता आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्याशी कोणताही संबध नाही, किंवा आधीही नव्हता.
सूरज पांचोलीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, 'मला हे अगदी ठामपणे आणि स्पष्टपणे सांगायचे आहे. मी माझ्या आयुष्यात कधीही दिवंगत दिशा सालियनला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भेटलो नाही. मी माझ्या आयुष्यात आदित्य ठाकरे यांनाही भेटलेलो नाही'. सूरज चव्हाण म्हणाला की, या प्रकरणात वारंवार त्याचे जोडणे हे त्याच्यासाठी 'अन्यायकारक आणि त्रासदायक आहे', असं म्हणाला. यावेळी सूरजने पोस्टच्या माध्यमातून लोकांना आवाहन केलं की, पुरावा किंवा दाखल्याशिवाय कुणाबद्दलही दावे करु नये', असं त्याने आपल्या पोस्टमधून सांगितलं.
View this post on Instagram
सूरज पांचोलीने यावेळी स्पष्ट केले की, आपल्याबाबतीत रिपोर्ट किंवा बातमीला प्रतिसाद देण्याची इच्छा नसल्यामुळे अभिनेता आतापर्यंत गप्प राहिला होता. पण या प्रकरणात त्याचे नाव वारंवार समोर येऊ लागले होते, त्यामुळे त्याला या प्रकरणी जाहीरपणे बोलणे आवश्यक वाटले होते. सूरज पंचोलीने असेही सांगितले की, या प्रकरणी सीबीआय आणि पोलिसांनी यापूर्वीच चौकशी केली आहे. अभिनेत्याच्या म्हणण्यानुसार, सुमारे चार ते पाच वर्षांपूर्वी त्याचा जबाबही नोंदवण्यात आला होता. 'माझ्याकडे काहीच लपवण्यासारखे नाही', असंही त्याने स्पष्ट केलं होतं.
सूरजने यावेळी स्पष्ट केलं की, 'जर कोणत्याही तपास यंत्रणेला पुन्हा कोणतीही माहिती हवी असेल किंवा पुन्हा कोणत्याही प्रकारचा तपास करायचा असेल, तर पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे', असं त्याने सांगितलं. 'एका व्यक्तीच्या मृत्यूचा वापर कोणत्याही व्यक्तीची प्रतिष्ठा मलिन करण्यासाठी केला जाऊ नये, विशेषत: जर त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नसतील', असंही यावेळी त्याने स्पष्ट केलं. 'हेडलाईन म्हणजे पुरावे नाही. चर्चेचा विषय हा देखील पुरावा नसू शकतो. कायदा आणि तपास यंत्रणांवर पूर्ण विश्वास आहे. सत्य अखेरी समोर येईल, याची मला खात्री आहे', असंही अभिनेत्याने स्पष्ट केलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या: