भारतावर घोंगावतंय मोठं संकट, ज्याची प्रचंड भीती तेच घडलं, महत्वाच्या सागरी मार्गावर..
GH News September 15, 2026 04:14 PM

भारत कच्च्या तेलासाठी इतर देशांवर अवलंबून आहे. त्यातच अमेरिका आणि इराण यांच्या युद्धात पुन्हा या देशांमधील तणाव वाढताना दिसला. इराण आणि अमेरिका युद्धात जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढताना दिसत आहेत. त्यातच पाईपलाईनवर झालेल्या हल्ल्याने जग हादरून गेले. मात्र, हा हल्ला नक्की कोणी केला हे स्पष्ट झाले नाही. या हल्ल्याची जबाबदारी कोणीही स्वीकारण्यास तयार नाही. या हल्ल्यानंतर यूएईने ही कच्च्या पाईपलाईन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. ज्याचा फटका भारतासह अनेक देशांना बसतंय. ही पाईलपलाईन होर्मुज खाडीला बायपाय करून येते. त्याच कच्च्या तेलाच्या पाईपलाईनला टार्गेट करण्यात आले. मात्र, एक गोष्ट निश्चित आहे: अमेरिकेने इराणविरुद्ध पुकारलेल्या युद्धामुळेच हे घडले. इराणची रणनीती अशी होती की, जर तेलावरून जागतिक संघर्ष पेटला, तर अमेरिकेला रोखण्यासाठी जग नक्कीच हस्तक्षेप करेल.

अमेरिका इराणवर मोठे हल्ले करत होती, त्यावेळी होर्मुज खाडी इराणने बंद केली. आता परिस्थिती नियंत्रणात येत होती, त्यादरम्यान महत्वाच्या पाईपलाईनवर हल्ला करण्यात आला. गॅसच्या पाईपलाईनवर हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली. सुरुवातीच्या काही अस्थिरतेनंतर सर्वांना असे वाटले की तेलाची परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात येत आहे.

इराणचा तो दबाव कमी प्रभावी ठरत आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झपाट्याने वाढ होत असताना भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली नाही. मात्र, तेल कंपन्यांवरील दबाव वाढत आहे. भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे थेच असल्याचे बघायला मिळतंय.

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ होत आहे. त्यातच भारतासह अन्य देश संकटात आहेत. भारताला ज्याची भीती तेच घडल्याचे बघायला मिळतंय. या पाईपलाईनवरील हल्ल्याने भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. भारतीय तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ करू शकतात, असा अंदाज आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.