Nanded Crime: दोन लाखांची सुपारी देऊन बापाचा खून... सहा दिवसानंतर उलगडलं हत्येमागचं गूढ; धक्कादायक कारण आलं समोर
esakal September 08, 2024 05:45 AM

नांदेड, ता. ७ : शहरातील हॉटेल व्यावसायिकाचा ता. एक सप्टेंबर रोजी राहत्या घरी रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळला होता. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. सहा दिवसांनंतर या प्रकरणाचा उलगडा झाला असून, मुलाने मित्राला दोन लाखांची सुपारी देऊन काटा काढल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी मुलासह इतर दोघांना अटक केली आहे. सुपारी घेणारा फरार असून, पोलिस त्याच्या शोधात आहेत. शेख यासेर अरफाद शेख युनूस, शेख अमजद शेख इसाक, योगेश शिवाजी निकम अशी संशयित आरोपींची नावे आहेत.

खडकपुरा येथील रहिवासी शेख युनूस शेख पाशा यांचे मदिना हॉटेल आहे. ते ३१ ऑगस्टच्या रात्री कुटुंबीयांसोबत झोपले होते. १ सप्टेंबरला सकाळी रक्तबंबाळ अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत तपासाची चक्रे फिरवली. परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता, दोन तरुण घटनेच्या दिवशी घरात शिरल्याचे दिसून आले. दरम्यान, पोलिसांकडून कुटुंबीयांतील सदस्यांचा जबाब घेण्यात आला. यावेळी मृताचा मुलगा शेख यासेर अरफाद शेख युनूस याच्यावर संशय बळावला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, सुपारी देऊन वडिलांचा खून केल्याची कबुली दिली. वडील मला व आईला मारहाण करत मानसिक त्रास देत होते. हा त्रास असह्य झाल्यामुळे वडिलांच्या हत्येसाठी मित्राला दोन लाख रुपयांची सुपारी दिल्याचे त्याने सांगितले.

Serial Killers Of Tenali : धक्कादायक!पहिल्यांदा मैत्री करायच्या अन् नंतर... तीन सीरियल किलर महिलांनी चौघाना संपवलं; वापरायच्या सायनाइड १० सप्टेंबरपर्यंत कोठडी

याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून, सुपारी घेणारा आरोपी फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. संशयित आरोपींना शुक्रवारी (ता. ६ सहा) न्यायालयात हजर केले असता, १० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली, अशी माहिती अपर पोलिस अधीक्षक सूरज गुरव यांनी दिली.

Oil and Gas Reserves Found in Pakistan : पाकिस्तानचे दिवस पालटणार! समुद्रात सापडले तेल अन् गॅसचे प्रचंड मोठे साठे
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.