X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु
esakal September 08, 2024 05:45 AM

ट्विटर अर्थात X हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म शनिवारी तासभरासाठी जगातील अनेक भागात डाऊन झालं होतं. यामुळं जगभरातील लाखो युजर्सना नव्या पोस्ट दिसत नव्हत्या किंवा करताही येत नव्हत्या. त्यामुळं त्यांचा संताप झाला होता. पण तासाभरानंतर ट्विटर पुन्हा सुरु झालं.

डाऊन डिटेक्टर वेबसाईटच्या माहितीनुसार, अमेरिकेत स्थानिक वेळेनुसार, सकाळी १०.२० मिनिटांनी ट्विटर डाऊन झालं. यासंदर्भात ७,७४३ हून अधिक रिपोर्ट युजर्सनं दाखल केले. सोशल मीडियाच्या सेवेत अडथळा येणं किंवा ते डाऊन होण्यावर नजर ठेवणाऱ्या या वेबसाईटनं युजर्ससह अनेक सोर्सेसचे रिपोर्ट एकत्र करुन याबाबत माहिती दिली होती. पण याचा भारतावर विशेष फरक पडलेलं जाणवलं नाही.

डाऊनडिटेक्टरच्या इंडियन व्हर्जननं म्हटलं की, ट्विटर डाऊन झाल्याच्या २६० तक्रारी आम्हाला मिळाल्या. यामध्ये भारतातील ८० टक्के युजर्सनं ट्विटरला प्रॉब्लेम येत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. तर ११ टक्के युजर्सनी आम्हाला लॉगिन करताना अडचणी येत असल्याचं म्हटलं होतं. तर ९ टक्के युजर्सच्या माहितीनुसार त्यांना ट्विटर वापरताना समस्या येत होत्या.

तर दुसरीकडं अमेरिकेत ४८ टक्के युजर्सनं तक्रार करताना म्हटलं की, आम्हाला ट्विटरच्या वेबसाईटवर जाता येत नाहीए. तर ५२ टक्के युजर्सनं आम्हाला ट्विटरचं अॅप वापरताना अडचण येत असल्याचं म्हटलं. तर अमेरिकेत केवळ २ टक्के युजर्सनाच आपलं अकाऊंट लॉगिन करताना अडचणीचा सामना करा करावा लागला.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.