मराठे एकदिवस मनोज जरांगे पाटलांचे कपडे फाडल्याशिवाय राहणार नाहीत, प्रसाद लाड यांची जहरी टीका
Marathi September 08, 2024 06:24 AM

प्रसाद लाड, मुंबई : “ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटलांची वक्तव्ये येत आहेत. याला मस्ती आणि माज नाही म्हणायचं तर आणखी काय म्हणायचं? विरोधात बोलणार प्रत्येक जण देवेंद्र फडणवीसांचा माणूस आहे म्हणतात. प्रत्येक जण हा भाजपचा माणूस म्हणतात. हा मात्र शरद पवार आणि महाविकास आघाडीचा माणूस आहे. ज्या पद्धतीने जरांगेंनी मराठ्यांचं नुकसान केलं. ईडब्लूएस बद्दल चुकीची माहिती दिली. मराठ्यांना खड्ड्यात घालण्याचं काम केलं. एक दिवस हेच मराठे मनोज जरांगेंचे कपडे फाडल्याशिवाय गप्प बसणार नाहीत”, असं भाजप नेते प्रसाद लाड म्हणाले. ते मुंबईत बोलत होते.

तुमच्यामध्ये हिंमत असेल तर चर्चेला या, देवेंद्र फडणवीसांची चूक दाखवा

प्रसाद लाड म्हणाले, मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगितलं. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर चर्चेला या. देवेंद्र फडणवीसांची चूक दाखवा. ज्या वेळी मी बोललो, प्रवीण दरेकर बोलले. त्यानंतर हे सर्व नेते आणि मराठा आमदार बोलले असते. तर तुमच्यावर चढलेल्या माजाची चादर टराटरा फाटली असती. राजेंद्र राऊतांना म्हणता तुम्हाला घरात येऊन बघून घेतो. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर महाराष्ट्रात 288 उमेदवार उभे करा. राजा तुमच्यामागे आम्ही मराठे एक आहोत. ताकदीने उभे राहू. याचा ढोंगीपणा उघड करु.

राजेंद्र राऊत आणि मनोज जरांगेंची एकमेकांवर जोरदार टीका

बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. शिवाय मी फुकलो असतो तर उदयनराजे पडले असते, असं मनोज जरांगे म्हणाले होते, असा आरोपही राऊत यांनी केला होता. दरम्यान राजेंद्र राऊत यांच्या आरोपांना मनोज जरांगेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. मी राजगादीचा किती आदर करतो, हे उदयन महाराजांना माहिती आहे. तुम्ही मराठ्यांचे तुकडे पाडायला बसलात. तुमच्यापेक्षा सोपल बरे. आपल्या विचारांचे ओबीसी बरे, असंही मनोज जरांगे म्हणाले. शिवाय राजेंद्र राऊत बोलत नाहीत, तर त्यांना देवेंद्र फडणवीस बोलायला सांगतात, असंही जरांगेंनी नमूद केलं.

राजेंद्र राऊत यांनी त्यांचे विरोधक दिलीप सोपल यांच्याबाबत माझ्याकडे तक्रार केली होती. दिलीप सोपल ते मोठे सावकार आहेत, माझ्या मतदारसंघात मी लोकसभेला 55 हजारांनी मागे पडलो. आता विधानसभेला काय झालं तर संपलोच, असं माझ्याजवळ राजेंद्र राऊत यांनी मला सांगितलं होतं, असंही मनोज जरांगे म्हणाले होते.

इतर महत्त्वाच्या बातम्या

अधिक पाहा..

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.