Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची… पहा लालबागच्या राजाची आरती
GH News September 16, 2024 08:11 PM

गणेशोत्सवाचा अंतिम टप्पा जवळ आल्याने विसर्जनाच्या तयारीला वेग आला आहे. गणेशोत्सवादरम्यान लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये केवळ मुंबईकरच नाही तर देशभरातील भाविक सहभागी झालेत. विशेष म्हणजे, लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी व्हीव्हीआयपी आणि सेलिब्रिटींची मोठी फौज पाहायला मिळतेय, त्यामुळे सर्वसामान्य भाविकांना राजाच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगेत उभे राहून काहिशी प्रतिक्षा करावी लागतेय. अशातच सोमवारी सकाळी ६ वाजल्यापासून लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची रांग बंद करण्यात आली असून मध्यरात्री १२ वाजल्यापासून मुखदर्शन रांग बंद होणार आहे. विसर्जनाच्या तयारीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी मान्यवरांनीही लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आहे. बघा याच लालबागच्या  राजाची आरती….

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.