राज्यातील ‘या’ जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन. बाप्पासाठी साकारला अनोखा देखावा
GH News September 16, 2024 08:11 PM

बीड जिल्ह्यातील परळी येथे अस्तित्व गणेश मंडळांनी बारा ज्योतिर्लिंगाचा देखावा आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी साकारला आहे. यामुळे भाविकांना बाराही ज्योतिर्लिंगाचे दर्शन एकाच ठिकाणी करता येत आहे. या ठिकाणी या देखाव्याची मांडणी ही द्वादश ज्योतिर्लिंग स्त्रोत्राप्रमाणे करण्यात आली आहे. बीडच्या परळीत साकारण्यात आलेला हा देखावा सध्या भाविक आणि नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र बनलेला दिसून येत आहे. या गणेश मंडळाकडून दरवर्षी नवी-नवीन देखावे सादर केले जातात. देखाव्या बरोबरच या गणेश मंडळाची मूर्तीही आकर्षक आणि भव्य असल्याचे पाहायला मिळत आहे. 18 फूट उंच असलेली लालबागच्या राजाची मूर्तीही आकर्षणाचे केंद्र बनलेली असून परळी शहरातील सर्वात उंच गणेश मूर्तीही याच मंडळाची असल्याचे सांगण्यात येत आहे. परळीतील आर्टिस्ट धनंजय स्वामी यांनी हा देखावा साकारला असून देखावा पाहण्यासाठी याठिकाणी गर्दी होताना दिसत आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.