छोट्या शहरातून येत आयटी कंपनीला नेले सातासमुद्रापार! उद्योजिका अनुराधा सिंग यांची Success Story जाणून घ्या...
Times Now Marathi September 20, 2024 07:45 AM

Success Story: आयटी क्षेत्र आता झपाट्याने वाढते आहे. सध्या केवळ कॉम्यूटर्स किंवा स्मार्टफोन्सच नाही तर यापुढे जात आयटी क्षेत्रात मोठी क्रांती होताना दिसते आहेत. मुंबईसह, पुणे, चेन्नई, बंगलोर, दिल्लीसारख्या शहरांमध्ये मोठमोठ्या आयटी कंपन्या या विस्तारू लागल्या आहेत. त्यामुळे या क्षेत्रात मोठ्या संधी निर्माण होत आहेत. एवढंच नाही तर हुशार आंतत्रप्रनर्सदेखील या क्षेत्रात पाय रोवत असून यशस्वीही होत आहेत. त्यातीलच एक उद्योजिका आहेत अनुराधा सिंग. त्यांच्या इनविजार्ड्स सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी या कंपनीने आतापर्यंत चांगली भरारी मारली असून त्यांच्या यशोगाथेबद्दल आपण या लेखातून थोडक्यात जाणून घेणार आहोत.

इनविजार्ड्स सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी या कंपनीने आयटी क्षेत्रात 13 वर्ष पूर्ण केली आहेत. अनुराधा सिंग यांनी आपले हे आयटी क्षेत्रातील स्वप्न साकार केले केले आणि सोबतच एका छोट्याशा शहरातून येऊन त्यांनी ही कंपनी गेल्या 13 वर्षांत मोठ्या प्रमाणात विस्तारली आहे. तीन देशातही ही कंपनी कार्यरत आहे.

या क्षेत्रातील त्यांची व्यावसायिक प्रगतीच नाही तर यामुळे महिलांचे झालेले सशक्तीकरणही दिसून येते. महिलाही उत्कृष्ट नेतृत्व दाखवू शकतात. त्यांनाही आपल्या क्षमता ठाऊक आहेत, हे यातून कळते. इनविजार्ड्स या त्यांच्या कंपनीने केवळ या उद्योगातच प्रगती केली नसून यावेळी त्यांनी नव्या, होतकरू महिलांनाही करिअरच्या नव्या वाटा दाखवून दिल्या आहेत. त्यांना दिशा दाखविली आहे. येथे काम करणाऱ्या महिलांचा वाटाही फार महत्त्वाचा आहे. त्यांची मेहनत, समर्पण, आणि नव्या कल्पना कंपनीला पुढे वाढवण्यासाठी फायदेशीर ठरत आहेत. ही कंपनी केवळ भारतातच नाही तर संपूर्ण अमेरिका आणि युरोपमध्येही आपली आगळीवेगळी सेवा देत आहे.

कंपनीने मोबाईल ऍप्लिकेशन, वेब सॉल्यूशन्स आणि अनेक इतर तांत्रिक बाबींमध्ये आपली सेवा सशक्त केली आहे. परिश्रम, समर्पण करण्याची तयारी असेल आणि प्रत्येक संधीचे सोने करण्याची धमक असेल तर आपण कोणतेही कठीण काम हे सहज पूर्ण करू शकतो, अशी अनुराधा आणि त्यांच्या टीमची धारणा आहे. त्यामुळे ही कंपनी आता मोठी प्रगती करताना दिसत आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.