seven women injured by firecrackers during ganpati immersion in umred KP
Marathi September 21, 2024 11:24 PM


नागपूर जिल्ह्यात गणपती विसर्जनादरम्यान गुरूवारी रात्री फटाक्यांमुळे सात महिला भाजल्याची घटना घडली आहे. या महिला गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे.

नागपूर : नागपूर जिल्ह्यात गणपती विसर्जनादरम्यान गुरूवारी रात्री फटाक्यांमुळे सात महिला भाजल्याची घटना घडली आहे. या महिला गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे. नागपुरातील उमरेड या भागामध्ये संबंधित मंडळाकडून गणेश विसर्जनासाठी ढोल- ताशांसह फटाक्यांचेही प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या मिरवणुकीत परिसरातील नागरीक मोठ्या संख्येंने सहभागी झाले होते. यावेळी मंडळाच्या काही कार्यकर्त्यांनी फटाके पेटवले होते मात्र त्या फटाक्यांचा अचानक स्फोट होऊन या आगीमध्ये त्या परिसरातील जवळपास सात महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यामुळे या घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली माजली आहे. (Seven women injured by firecrackers during ganpati immersion in umred.)

हेही वाचा : BSF Bus Accident : बीएसएफ जवानांची बस कोसळली दरीत; तीन हुतात्मा…जखमींची संख्या वाढण्याची भीती

– Advertisement –

नागपूरमधील उमरेड या भागातील शिवस्नेह गणेश मंडळाद्वारे आयोजित केला जाणारा गणेशोत्सव उमरेडचा राजा या नावाने प्रसिद्ध आहे. दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. तसेच प्रत्येक वर्षी या ठिकाणाची मिरवणूक ही आकर्षण केंद्र असते. मात्र गुरूवारी रात्री मंडळाकडून गणेश विसर्जनाची मिरवणूक निघाली असता ही घटना घडल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच या घटनेंनंतर परिसरातील लोकांनी ताबडतोब त्या जखमी झालेल्या महिलेंना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तसेच तिथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना नागपूरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा : Siddharth Nagar : पत्राचाळीतील घरांच्या बांधकामाच्या निविदेला या कारणाने मुदतवाढ

– Advertisement –

सध्या सातही जखमी महिलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच महत्त्वाचे म्हणजे या मिरवणुकीत फटाके प्रदर्शन करताना कोणत्याही सुरक्षेविषयक उपाययोजना केले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांकडून या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, या मंडळातील कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. (Seven women injured by firecrackers during ganpati immersion in umred.)


Edited By Komal Pawar Govalkar



Source link

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.