Bigg Boss: दोनच आठवड्यात Sangram Chougule ने घेतला बिग बॉसचा निरोप, 'या' कारणामुळे जावं लागलं घराबाहेर
esakal September 22, 2024 06:45 AM

Sangram chougule exit from bigg boss marathi : बिग बॉस मराठीचा ५ वा हंगाम सध्या गाजतोय. गेल्या आठ आठवड्यात मोठ्या प्रमाणात टीआरपीही या सिजनला मिळालाय.

अशात दोन आठवड्यापूर्वी वाईल्ड कार्ड एन्ट्रीसह बॉडी बिल्डर संग्राम चौगुले बिग बॉसच्या घरात आला होता. पण आता दोन आठवड्यात त्याला घराबाहेर पडावे लागले आहे. यामागील कारण म्हणजे संग्रामला झालेली दुखापत.

आठव्या आठवड्यात कॅप्टन्सी टास्क सुरू असताना अरबाजबरोबर झटापटीदरम्यान संग्रामच्या हाताला फ्रॅक्चर झाले. तसेच पाठीलाही इजा झाली आहे. त्यामुळे त्यांना डॉक्टरांकडून तपासण्यात आले असून रिपोर्ट आले आहेत.

या दुखापतीमुळे संग्राम यांना हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागणार असल्याचे बिग बॉस यांनी सांगितले आहे. याच कारणामुळे संग्रामला बिग बॉसच्या घराचा निरोप घ्यावा लागला आहे.

संग्राम सातव्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात सामील झाले होते. त्यांची घरात आल्यानंतर पहिल्याच आठवड्यानंतर रितेश देशमुख यांच्याकडून भाऊच्या धक्क्यावर कानउघडणीही करण्यात आली होती. तसेच त्यांची जान्हवी किल्लेकरबरोबर चांगली मैत्रीही दिसली. मात्र आता संग्रामला दुखापतीमुळे या घरातून बाहेर जावे लागले आहे.

आर्याही घराबाहेर

दरम्यान, आर्या जाधव हिला देखील सातव्या आठवड्यानंतर बिग बॉसमधून प्रेक्षकांच्या मतांमुळे नाही, तर घरात हिंसाचार केल्याने बाहेर पडावे लागले होते. तिने निक्की तांबोळी हिच्या कानाखाली मारल्याने तिला घराबाहेर जावे लागले होते.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.