ऑस्ट्रेलियाचा आणखी एक विक्रम; भारतापेक्षा भारी पाकिस्तानचा पराक्रम
esakal September 22, 2024 06:45 AM
२-० आघाडी

ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या वन डे सामन्यात इंग्लंडवर ६८ धावांनी विजय मिळवून मालिकेत २-० अशी आघाडी घेतली.

ENG vs AUS 2nd ODI २७० धावा तरीही..

ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ ४४.४ षटकांत २७० धावांत तंबूत पाठवण्यात इंग्लंडला यश

ENG vs AUS 2nd ODI एलेक्सची फटकेबाजी

एलेक्स केरीने ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक ७४ धावा केल्या, तर कर्णधार मिचेल मार्शने ६० धावा केल्या

ENG vs AUS 2nd ODI २०२ धावांवर All Out

इंग्लंडचा संपूर्ण संघ ४०.२ षटकांत २०२ धावांवर ऑल आऊट झाला. जेमी स्मिथने सर्वाधिक ४९ धावा केल्या.

ENG vs AUS 2nd ODI स्टार्कचा स्पार्क

मिचेल स्टार्कने ३, तर जोश हेझलवूड, आरोन हार्डली व ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

ENG vs AUS 2nd ODI सलग १४ वा विजय

ऑस्ट्रेलियाचा वन डे क्रिकेटमधील हा सलग १४ वा विजय ठरला आणि ते दुसऱ्या क्रमांकावर सरकले.

ENG vs AUS 2nd ODI २१ विजयांचा विक्रम

वन डेत सलग सर्वाधिक २१ विजयांचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्याच नावावर आहे. त्यांनी जानेवारी ते मे २००३ या कालावधीत हा पराक्रम केला होता.

ENG vs AUS 2nd ODI श्रीलंकेला मागे टाकले

आज ऑस्ट्रेलियाने १३ विजय मिळवणाऱ्या श्रीलंकेला ( जून ते ऑक्टोबर २०२३) मागे टाकून दुसरे स्थान पटकावले.

ENG vs AUS 2nd ODI सलग १२ विजय

दक्षिण आफ्रिका ( फेब्रुवारी ते ऑक्टोबर २००५), पाकिस्तान ( नोव्हेंबर २००७ ते जून २००८ )आणि आफ्रिका ( सप्टेंबर २०१६ ते फेब्रुवारी २०१७) सलग १२ विजयासह मागे आहेत.

ENG vs AUS 2nd ODI भारत टॉप ६ मध्ये नाही

भारतीय संघाने ऑक्टोबर ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सलग १० विजय मिळवले होते.

Rohit Sharma अफगाणिस्तानने 12 पैकी 11 संघांना पाजलं पाणी, लिस्टमध्ये भारत... Afghanistan Cricket Team येथे क्लिक करा
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.