MPSC Mains 2023 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर; महेश घाटुळे परीक्षेत पहिला, मुलींमध्ये वैष्णवी बावस्कर अव्वल
esakal September 27, 2024 05:45 AM

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीनं घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२३ परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात महेश घाटुळे यानं प्रथम क्रमांक पटकावला आहे.

Maharashtra Investment : ग्रीन एनर्जी क्षेत्रात करार! 1.08 लाख रोजगार, 61.5 हजार मेगावॅट वीज, 3.40 लाख कोटींची गुंतवणूक

या परीक्षेत प्रीतम सानप यानं दुसरा, तर शुभम पवार यानं तिसरा क्रमांक पटकावला आहे. तर वैष्णवी बावस्कर हिनं मुलींमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. आता उमेदवारांना आपल्या पदांचे पसंतीक्रम द्यावं लागणार आहेत. या परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाची आहे.

Haji Ali Dargah Bomb Threat: मुंबईतील 'हाजी अली दर्ग्या'ला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! अज्ञात फोनमुळं खळबळ

अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगानं अंतिम निकालापूर्वी प्रमाणपत्रे / कागदपत्रे पडताळणी करताना काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये बदल होऊ शकतो आणि पर्यायानं उमेदवाराचा गुणवत्ता क्रम बदलू शकतो आणि उमेदवार अपात्र ठरू शकतो, असं एमपीएससीनं स्पष्ट केलं आहे.

MPSC Agri Exam: एमपीएससी परीक्षेत कृषी विभागाचा अखेर समावेश; 258 जागांसाठी होणार परीक्षा

ही सर्वसाधारण गुणवत्ता यादी विविध न्यायालयात किंवा न्यायधिकरणात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणांवरील अंतिम न्याय निर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आली आहे. वैद्यकीय अहवाल विचारात घेऊन उमेदवारांना पदांचे पसंतीक्रम ऑनलाईन स्वरुपात सादर करण्याची सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल, असंही आयोगानं स्पष्ट केलं आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.