Chopda Crime News : संशयाचे भुताने प्रेमाचा झाला शेवट; प्रियकराने केली प्रेयसीची हत्या
Saam TV September 28, 2024 06:45 AM

अडावद (जळगाव) : प्रेयसीचे दुसऱ्या कोणासोबत प्रेम संबंध असल्याचा संशय प्रियकराला होता. यावरून दोघांमध्ये नेहमी वाद होत होते. यातूनच प्रियकराने महिलेचा गळा आवळून खून केल्याची घटना चोपडा तालुक्यातील गोरगावले खुर्द येथे घडली आहे. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे.

जळगावच्या चोपडा (Chopda) तालुक्यातील गोरगावले खुर्द येथील बापशीबाई मोहन पावरा (वय ४५) असे घटनेत मृत महिलेचे नाव आहे. बापशीबाई या परिवारासह गावात वास्तव्यास होत्या. दरम्यान बापशीबाई या महिलेचे गावातीलच अनिल विरची पावरा याच्यासोबत प्रेमसंबंध होते. मात्र आपल्या प्रेयसीचे दुसऱ्या कोणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय अनिल पावरा याला होता. यावरून दोघांमध्ये नेहमी (Crime News) वाद होत होते. 

Buldhana crime News : धक्कादायक..खासगी शिकवणी वर्गात विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; शिक्षक पोलिसांच्या ताब्यात

दरम्यान संशयित पावरा व संबंधित महिला यांच्यात किरकोळ कारणावरून सारखी भांडणे होत होती. त्यातूनच २४ सप्टेंबरच्या रात्री संशयित पावराने महिलेचा गळा आवळून खून केल्याचे उघडकीस आले. याबाबत माहिती मिळताच अडावद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. तसेच घटनेचा पंचनामा केला. याबाबत अडावद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित अनिल पावरा याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.