शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी किसान रेल सुरु करा, स्वतंत्र भारत पक्षाची मागणी
Marathi October 04, 2024 04:24 AM

किसान रेल: अहमदनगर, पुणेसोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फळे, फुले व भाजीपाला पिकतो. परंतू, किसान रेल बंद आहेत व प्रवाशी जलद रेल्वे गाड्यांमध्ये अपुरी जागा असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. नुकसान टाळण्यासाठी या मार्गावर किसान रेल सुरू करावी अशी मागणी स्वतंत्र भारत पक्ष, जन संसद संघटना व पीपल्स हेल्पलाईन यांनी केली आहे. या संघटनांच्या वतीनं येत्या 7 ऑक्टबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांचा नाशिवंत शेतीमाल लवकरात लवकर व कमी खर्चात देशातील इतर बाजार पेठेत पोहोचवता यावा म्हणून केंद्र शासनाने अनेक किसान रेल सुरू केल्या होत्या. शेतकऱ्यांना त्याचा फायदा होता होता. मात्र, सरकारने बऱ्याच किसान रेल बंद केल्या आहेत. महाराष्ट्रातून उत्तर भारतात व पूर्वेकडच्या राज्यांमध्ये जाणाऱ्या जलद प्रवासी गाड्यांमध्ये फक्त आर्धा डबा (बोगी) पार्सल साठी असतो. मोठ्या शहरातून सुटणाऱ्या गाड्यांमध्ये आगोदरच औद्योगिक कारखान्यांचा स्टील, लोखंडाचा माल, गाड्यांचे सुटे भाग भरले जातात. पुढील स्टेशनवर येणारा शेतमाल चढविण्यासाठी जागा रहात नाही. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचा माल पाठवला जात नाही व खराब होऊन जातो. पार्सलच्या डब्यात जागा कमी आल्यामुळे माल चाढवणारे ठेकेदार, प्राधान्य देण्यासाठी शेतकऱ्यांकडून अव्वाचे सव्वा हमाली वसूल करतात.

7 ऑक्टोबरला 11 ते 4 यावेळेत आंदोलन

रेल्वे मंत्रालयाने बंद केलेल्या किसान रेल सुरू कराव्यात, गरज असेल तेथे नवीन किसान रेल सुरू कराव्यात. जेथे किसान रेलची सुविधा नाही तेथे प्रत्येक जलद प्रवासी गाडीला एक स्वतंत्र बोगी फक्त शेतीमालासाठी जोडण्याची व्यवस्था करावी या मागणीसाठी सोमवार दिनांक 7 ऑक्टबर रोजी सकाळी 11 वाजे पासून सायं 4 वाजे पर्यंत जिल्हाधिकारी अहमदनगर कार्यालयासमोर एक दिवसीय ठिय्या आंदोलन करणार आहोत. या आंदोलनास शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आंदोलनाच्या नेत्यांनी केले आहे. हे आंदोलन शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाचे नेते अनिल घनवट, भारतीय जन संसदेचे नेते अशोक सब्बान व पीपल्स हेल्पलाईनचे नेते अॅड. कारभारी गवळी यांच्या नेतृत्वाखाली हे ठिय्या आंदोलन करण्यात येईल अशी माहिती स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

महत्वाच्या बातम्या:

Kisan Rail : बंद झालेली किसान रेल पुन्हा सुरु करा, खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची रेल्वेमंत्र्यांकडं मागणी

अधिक पाहा..

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.