Indriya Jewellery : आदित्य बिर्ला ग्रुप'तर्फे इंद्रिया मुंबईत लाँच, हिऱ्यांच्या डिझाईन्स पाहून थक्क व्हाल
Times Now Marathi October 06, 2024 06:45 AM

मुंबई : आदित्य बिर्ला ग्रुपच्या (Aditya Birla Group) वतीने आज देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत (Mumbai) त्यांचा ज्वेलरी ब्रांड इंद्रिया’ (Jewellery brand Indriya) च्या लाँचची घोषणा करण्यात आली. जुलै महिन्यात लाँच झालेल्या या समूहाने एकूण आठ दालने उघडली आहेत - दिल्लीत तीन, इंदूर, अहमदाबाद, पुणे, मुंबई आणि जयपूरमध्ये प्रत्येकी एक. मुंबईतील बोरिवली येथील नवीन दालनासह हा समूह आपल्या मजबूत ब्रँड इक्विटी आणि बाजारपेठेतील सखोल अंतर्दृष्टीचा लाभ घेत, त्याच्या ग्राहक पोर्टफोलिओला आणखी बळकट करतो आहे.

मुंबई, भारताची गजबजलेली आर्थिक राजधानी, आपल्या लकाकणाऱ्या अलंकार बाजाराची चमक साजरी करते. इंद्रियाकरिता हे शहर देशातील आशादायक प्रदेशांपैकी एक असून फॅशनने प्रेरित, वैविध्यपूर्ण आणि समृद्ध ग्राहकांशी संपर्क साधण्याची एक ‘हटके’ संधी मिळवून देते. समकालीन कलांना आपल्यात मिसळून मुंबई शहर दागिन्यांच्या रिटेल विक्रीसाठी एक रोमांचक पार्श्वभूमी प्रदान करते. ज्यामुळे उत्कृष्ट हस्तकला आणि अद्वितीय डिझाईन प्रदर्शित करण्यासाठी ते एक आदर्श ठिकाण म्हणून तिची ओळख आहे.

दागिन्यांच्या रिटेल क्षेत्रात क्रांतीआदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी पुढील पाच वर्षांत भारतातील पहिल्या तीन दागिन्यांच्या रिटेल विक्रेत्यांमध्ये स्थान मिळवण्याच्या उद्देशाने जुलैमध्ये इंद्रियाची सुरुवात केली. या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला तब्बल 5,000 कोटी रुपयांच्या अभूतपूर्व गुंतवणुकीचा पाठिंबा आहे, जो भारतातील दागिन्यांच्या रिटेल क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याच्या आदित्य बिर्ला समूहाच्या वचनबद्धतेला अधोरेखित करतो.

मादी चिंकारा हरणाची निवड‘इंद्रिया’ या ब्रँड नावाचा उगम संस्कृत भाषेतून झाला आहे. ही भाषा समृद्ध भारतीय संस्कृतीचे दुसरे स्वरूप आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर, इंद्रिया म्हणजे शक्ती; पाच इंद्रियांची ताकद, आपल्या चेतनेला चालना देणारी इंद्रिये, आपल्याला सभोवतालच्या जगाचा अनुभव घेण्यास आणि अन्वेषण करण्यास प्रवृत्त करतात. आपल्या अस्तित्वाची व्याख्या करतात! सुंदर ब्रँड चिन्ह म्हणून इंद्रियाने मादी चिंकारा हरणाची निवड केली आहे. हा प्राणी इंद्रियांचे रूपक असून स्त्रीचे सौंदर्य आणि शालिनतेचे प्रतीक आहे. ब्रँड अनुभव तुमच्या इंद्रियांना एकापेक्षा जास्त मार्गांनी गुंतवून ठेवेल आणि तुमचे हृदय 'दिल अभी भरा नहीं' गुणगुणायला प्रवृत्त होईल! मायेने तयार केलेला प्रत्येक अलंकार सोने, पोल्का आणि हिऱ्यांच्या 16000 हून अधिक नवीन डिझाईनसह भारतीय शिल्पकलेची भावना प्रतिबिंबित करतो.

कालातीत हस्तकलेचे मिश्रण - दिलीप गौरआम्ही इंद्रियाच्या माध्यमातून दागिन्यांच्या क्षेत्रातील सर्जनशीलता, प्रमाण, तंत्रज्ञान आणि ग्राहकांच्या अनुभवातील मानकांची पुन्हा व्याख्या करण्यास तयार आहोत. दागिन्यांचा प्रत्येक नमुना हस्तकलेची एक अनोखी कथा सांगतो या समजुतीवर घडविण्यात आला आहे. विशिष्ट उत्पादन, अपवादात्मक ग्राहक अनुभव आणि तल्लख खरेदीचा प्रवास हे शेवटी दागिन्यांद्वारे आत्म-अभिव्यक्तीला सक्षम करतात. आमचे उत्पादन कालातीत हस्तकलेचे मिश्रण आहे. आपली प्रादेशिक निवड अद्वितीयता साजरी करते, तसेच या निवडीत इतर संस्कृतींच्या शोधाची सज्जता दिसते असे इंद्रियाचे संचालक दिलीप गौर म्हणाले.




तज्ज्ञ दागिन्यांच्या सल्लागारांसह सानुकूलन सेवा - संदीप कोहली
दागिने ही एक श्रेणी म्हणून केवळ गुंतवणुकीपासून एका स्टेटमेंटपर्यंतचे परिवर्तन करत आहेत. आमचा प्रस्ताव समजण्याजोगा फरक, विशिष्ट रचना, वैयक्तिकृत सेवा आणि अस्सल प्रादेशिक बारकावे यावर आधारित आहे. इंद्रियाच्या प्रस्तावाच्या केंद्रस्थानी विशेष लाउंजसह नाविन्यपूर्ण सिग्नेचर अनुभव आहे. इन-स्टोअर स्टायलिस्ट आणि तज्ज्ञ दागिन्यांच्या सल्लागारांसह सानुकूलन सेवा सर्व पाचही इंद्रियांना चालना देणे आणि एक अतुलनीय खरेदी प्रवास तयार करण्याचे वचन देतात असे इंद्रियाचे सीईओ संदीप कोहली म्हणाले. आमच्या श्रेणीतील सर्वोत्तम डिजिटल फ्रंट एंडमुळे डिजिटल आणि फिजिकल टचपॉईंटवर अखंड अनुभव निर्माण होईल. त्याचप्रमाणे दागिन्यांच्या किरकोळ व्यापारात नवीन युगाची सुरुवात होईल असे इंद्रियाचे संचालक दिलीप गौर म्हणाले.

इंद्रिया दालन स्वतःच्या पद्धतीने वैशिष्ट्यपूर्ण आहे. तो एक स्टुडिओ असू शकतो, जिथे वैयक्तिक स्टायलिस्ट तुमच्यासाठी खास वस्तू तयार करतो, तो भारतीय शिल्पकलेचा उत्सव असू शकतो, भावी वधूसाठी एक कलाप्रकार असू शकतो, जिथे ती विविध प्रकारच्या उत्कृष्ट डिझाईनमधून पसंतीचे अलंकार शोधू शकते.

आदित्य बिर्ला ग्रुपचा हॉलमार्क आहे विश्वासाचा अतूट धागा. मुंबईतील पहिल्या ‘इंद्रिया’ दालनाच्या साथीने उत्कृष्ट दागिन्यांचे विश्व अनुभवा.
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.