बिग बॉसचा विजेता होताच सुरज चव्हाणला मिळाला पहिला चित्रपट ; जाणून घ्या चित्रपटाचे नाव – Tezzbuzz
Marathi October 07, 2024 02:24 AM

बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन संपलेला आहे. आणि सुरत चव्हाण या या सिझनच्या विजेत्या पदावर त्याचे नाव कोरलेले आहे. बिग बॉस मराठीचा फिनालेमध्ये सुरज चव्हाण आणि अभिजीत सावंत हे टॉप 2 स्पर्धक ठरलेले होते. यातील बहुमताने सुरज चव्हाण हा बिग बॉस मराठी 5 चा विजेता झालेला आहे. यावेळी अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते.

यावेळी कलर्स मराठीचे प्रोग्रामिंग हेड तसेच दिग्दर्शक आणि लेखक केदार शिंदे देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी त्यांच्या पुढील चित्रपटाची घोषणा केली. आणि या चित्रपटात सुरज हा मुख्य भूमिकेत असेल असे देखील त्यांनी सांगितलेले आहे. केदार शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार ते झापुक झुपूक नावाचा एक नवीन चित्रपट काढणार आहे .आणि यामध्ये सुरज चव्हाण हा मुख्य भूमिका साकारणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिलेली आहे. यामुळे सुरजच्या चाहत्यांसाठी ही एक खूप मोठी आनंदाची बातमी आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.