धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पुणे-नागपूर रेल्वे धावणार
esakal October 07, 2024 05:45 AM

पुणे, ता. ६ धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून मध्य रेल्वेने नागपूरसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. यात पुण्याहून एक विशेष रेल्वे धावणार आहे.
पुणे-नागपूर विशेष रेल्वे : गाडी क्रमांक (०१२१६) पुण्याहून ११ ऑक्टोबरला दुपारी ४ वाजता सुटेल. दुसऱ्यादिवशी सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी नागपूरला पोचेल.
- गाडी क्रमांक ((०१२१५) नागपूरहून १२ ऑक्टोबरला रात्री ११ वाजता सुटेल. पुण्याला दुसऱ्यादिवशी रात्री ८ वाजता पोचेल. या गाडीला वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नंदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, नगर व दौंड कॉर्ड लाईन आदी स्थानकांवर थांबा दिला आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.