भोळेपणा, मनात कपट नाही, बिग बॉस विजेत्या सुरज चव्हाणला शिव ठाकरेने दिली शाबासकी, म्हणाला...
जयदीप मेढे October 07, 2024 12:13 PM

Shiv Thackeray on Suraj Chavan: बिग बॉस मराठीचा पाचवा सीजन आता संपला आहे . बारामतीचा सूरज चव्हाण झापुक झुपूक ,बुक्कीत टेंगूळ स्टाईलमुळे घरोघरी चर्चेचा विषय ठरला . गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सगळ्यांच्याच गळ्यातील ताईत झालेल्या सुरजवर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केलाय दरम्यान बिग बॉस मराठीचा ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर बिग बॉस मराठी दोन पर्वाचा विजेता शिव ठाकरेनेही सुरज च्या विजयावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे . ग्रामीण भागातून आलेल्या सुरजने महाराष्ट्रातील लोकांच्या मनात पटकन घर केल्याचं सांगत ही सुरजचा हक्काची ट्रॉफी होती . तो डिजर्व्ह करत होता , असं बिग बॉस मराठी च्या दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरे म्हणालाय. 

काय म्हणाला शिव ठाकरे? 

ग्रामीण भागातून आलेल्या सुरजने हा शो जिंकल्यावर शिव म्हणाला, 'ज्याला या ट्रॉफीची आणि ट्रॉफीपेक्षा त्या पैशांची, ज्याचा आयुष्य बदलणार होतो त्याच्या हाती ट्रॉफी गेली आहे. आपण म्हणतो ना की साधा भोळा ज्याच्या मनात कपट नाही, याच गोष्टी आपल्या महाराष्ट्रातील लोकांच्या मनात पटकन घर करतात. सुरज च्या हक्काचे ट्रॉफी होती तो डीझर्व करत होता.'

सुरजला गेम कळलाच नाही, शिव म्हणाला...

बिग बॉसच्या टास्कमध्ये कुणाचा गेम सर्वात चांगला होता सूरजचा गेम कसा होता यावरही शिवण प्रतिक्रिया व्यक्त केली. तो म्हणाला, खेळ पाहिल्यास मी म्हणेन की अभिजीत सावंतचा गेम चांगला होता. पण सुरज चव्हाणला गेम कळलाच नाही. त्याच्या साधेपणामुळे महाराष्ट्रातील लोकांना तो भावला. आणि त्याच्या हाती ट्रॉफी आली. त्याच्यासाठी रॅली निघाली. लोक मला म्हणायचं आपला सुरज आहे. लोकांच्या मनात त्याच्यासाठी खूप आपुलकी असल्याने त्याला ट्रॉफी मिळाली. गणपती बाप्पांनी त्याला आणखी पुढे न्यावं. तू देवाचा मुलगा आहे, असं बिग बॉस मराठीचा दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरे म्हणाला.न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत शिव ठाकरे याने सुरज प्रमाणेच इतरांनाही संधी मिळायला हवी अशी प्रतिक्रिया दिली आहे. 

सुरजला आणणाऱ्या बिग बॉसला सलाम 

बिग बॉसच्या प्लॅटफॉर्मवर सर्वसामान्य माणूस विजेता ठरू शकतो हे सिद्ध झालं असं शिव म्हणाला. एका छोट्या घरातून, छोट्या गावातून आलेला जो आधीच खूप संकटातून बाहेर आला त्याला बिग बॉस मधील टास्क आणि बाकी गोष्टी खूप छोट्या वाटतात. अशा लोकांना जेवणात एखादी पोळी कमी मिळाली चहा नाही मिळाला तरी त्या गोष्टी लहान वाटतात. कारण तो खूप गोष्टी पाहून इथवर पोचलेला असतो. सुरज प्रमाणेच इतर कला असलेल्या लोकांना संधी मिळायला हवी असे शिव म्हणाला.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.