लायन्स क्लबचा आदर्श शिक्षक पुरस्कार
esakal October 09, 2024 03:45 AM

१७३२५


अमित साळवी यांना
आदर्श शिक्षक पुरस्कार
सावर्डे, ता. ८ : गोविंदराव निकम माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयाचे सहायक शिक्षक अमित साळवे यांना येथील लायन्स क्लब ऑफ सावर्डेच्यावतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
शिक्षण क्षेत्रासह विविध क्षेत्रात पारंगत असणाऱ्या व सामाजिक उपक्रमात कृतिशील शिक्षकांना लायन्स क्लब ऑफ सावर्डेच्यावतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन दरवर्षी गौरवण्यात येते. साळवी यांनी शिक्षणक्षेत्रात काम करत असताना भारूड कलाकार म्हणून अत्यंत उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. भारूड या माध्यमाद्वारे आजअखेर दोन हजारांहून अधिक प्रयोगांचे सादरीकरण करून त्यांनी समाजप्रबोधनाचे सर्वोत्कृष्ट काम केले आहे. वगनाट्य लेखन, पोवाडा व गायन या क्षेत्रातही त्यांची कामगिरी उत्कृष्ट असून रस्सीखेच, डॉजबॉल, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, कॅरम या खेळांचे ते सुप्रसिद्ध खेळाडू असून राष्ट्रीय पंच म्हणून त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. भजन, प्रवचन व कीर्तन या आध्यात्मिक क्षेत्रात काम करत असताना समाजप्रबोधन करणे हा प्रमुख उद्देश त्यांनी आजही जपला आहे. विविध कार्यांतील त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिला आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल साळवी यांचे संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखर निकम, अध्यक्ष बाबासाहेब भुवड, संचालक शांताराम खानविलकर, सचिव महेश महाडिक, अनिरुद्ध निकम, प्राचार्य राजेंद्र वारे यांच्यासह सर्वांनी अभिनंदन केले.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.