सजग पालकत्वाचा 'कानमंत्र'
esakal October 09, 2024 11:45 AM

प्रांजल गुंदेशा

यशस्वी मुलांचे पालनपोषण करणे हे केवळ कठोर परिश्रम किंवा नशीब यावर अवलंबून नसते, तर मुले वाढत असताना त्यांच्या आजूबाजूला असलेली कौटुंबिक संस्कृती, दैनंदिन वातावरण आणि काही वेगळ्या सवयींची सातत्यपूर्ण अंमलबजावणी यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. पालकांनी आत्मसात कराव्यात अशा काही वेगळ्या सवयींची माहिती आपण घेऊया -

१. मुलांचे ‘चीअरलीडर’ व्हा

आत्मविश्वास असलेली मुले कोणत्याही गोष्टीत पटकन पुढाकार घेतात. सामाजिक स्तरावर वेगळी ओळख आणि जनसंपर्क वाढवतात. त्यामुळे त्यांना अधिक संधी मिळवता येतात. परंतु, याची सुरुवात घरातूनच होते. यासाठी पालकांनी मुलांना प्रोत्साहन द्यावे.

चुकांवर सकारात्मकतेने मात करण्यास शिकवावे आणि मुलांचे ‘चीअरलीडर’ होण्याचा प्रयत्न करावा. मुलांच्या कमकुवतपणापेक्षा त्यांचे सामर्थ्य आणि चांगुलपणावर अधिक लक्ष केंद्रित करावे. योग्य तिथे योग्य तेवढे कौतुक केल्याने त्यांना स्वतःवर विश्वास ठेवण्यास मदत होते आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो.

२. निर्णयक्षमते संस्कार

निर्णयक्षमतेचे हे संस्कार लहानपणी आजूबाजूला असलेल्या कुटुंबसंस्कृतीतूनच वाढीस लागतात. त्यामुळे मुलांसोबत छान वेळ घालवता येईल अशा जागा शोधा आणि सुट्टीवर जा.

३. विचारप्रवर्तक प्रश्न विचारा

यशस्वी लोक आपली क्षमता, काम करण्याची शैली याबाबत दक्ष असतात आणि त्याचा योग्य तो प्रभाव ते स्वतःच्या व्यक्तिमत्त्वावर पडू देतात. एका अर्थाने हा आत्मपरीक्षणाचा भाग असतो. त्यामुळे मुलांनी अशा प्रकारे आत्मपरीक्षण करावे असं तुम्हाला वाटत असेल, तर मुलांना मोकळेपणाने, त्यांना चिंतन करण्यास भाग पाडतील असे प्रश्न विचारतात. उदा - मुलांनी ‘हे कपडे मला चांगले दिसतात का?

असा प्रश्न विचारल्यावर तुम्ही त्यांना प्रतिप्रश्न करा. ‘हे कपडे घालून तुला कसे वाटते?’ असा प्रश्न तुम्ही मुलांना विचारा. ते स्वतःचे अनुभव, मत सांगतील असे प्रश्न विचारा. उदा. तुझ्या वर्गमित्रांपेक्षा तू वेगळा आहेस असं तुला का वाटतं? तुझ्यातील वेगळेपण काय?

४. मुलांना स्वतःची ध्येये ठरवू द्या

मुलांनी स्वत: ला जबाबदार करावे, प्रेरित करावे आणि अपेक्षित यश साध्य करावे असं वाटत असेल, तर मुलांना स्वतःची ध्येये ठरवू द्या. उदा. मुलांना ९५ टक्के गुण मिळवा असे सांगण्याऐवजी, तुम्हाला मोठेपणी कोणते गुण, ज्ञान अधिक मिळवायचे आहे असं त्यांना का विचारू नये? अशा प्रश्नांची उत्तरे मुले विचार करून देतात.

त्या उत्तरांनुसार त्यांच्याशी संवाद साधा. ध्येय प्राप्त करण्यासाठी त्यांना मदत, मार्गदर्शन करा. परंतु, यामध्ये कुठेही सक्ती करू नका. त्यांना त्यांच्या स्वत: च्या इच्छेनुसार आणि गतीने स्वतःच्या आयुष्याचे नियोजन करू द्या. त्यांच्यावर विश्वास ठेवा. जेव्हा मुलांना स्वतःची निवड कळते आणि आपल्या आतला आवाज ऐकू येतो तेव्हा ते अधिक प्रेरित होतात.

5 आठवणी निर्माण करा

मुलांची स्मरणशक्ती उत्तम असते. त्यामुळे एखादे गाणे, गोष्ट वगैरे घटकांशी त्यांच्या आठवणी संबंधित असतात. मोठे याच छोट्या-छोट्या आठवणींमधून अनेक सकारात्मक गोष्टी वाढीस लागतात. यासाठी मुलांच्या स्मरणात राहतील अशा गोष्टी करा.

त्यांच्यासोबत एखादे हटके गाणे गा, गोष्ट सांगा किंवा त्यांच्याकडून एखादी नवीन गोष्ट ऐका. हास्यविनोद करा. या सर्व गोष्टी तुमचे आणि मुलांचे नाते अधिक घट्ट करेल आणि त्याचे रूपांतर मैत्रीत होईल.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.